महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी दि. 25 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दि. 9 मार्च ते 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहे.
दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा करोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल महिन्यात दि. 25 एप्रिल 2021 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
✍️आवश्यक सूचना : शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता विद्यार्थ्यांची बँक खाते क्रमांक व आधारकार्ड अनिवार्य नाही.
🌐 महत्वाच्या लिंक :
१) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे लिंक :
२) स्कॉलरशिप इयत्ता पाचवी व आठवी करिता पोर्टल :
३) शाळा रजिस्ट्रेशन व शाळा माहिती प्रपत्र :-
https://www.mscepuppss.in/School_registration.aspx
४) शाळा लॉगीन :-
https://www.mscepuppss.in/LoginPage.aspx
📝 आवेदन पत्र भरणेबाबतच्या सूचना लिंक :
१) शाळा माहिती प्रपत्र
२) इयत्ता ५ वी आवेदन पत्र
३) इयत्ता ८ वी आवेदन पत्र
📝 इयत्ता ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा- 2021 माहिती :
१) अधिसूचना
२) वेळापत्रक
३) अभ्यासक्रम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा.धन्यवाद!