रविवार, ३१ जानेवारी, २०२१

उच्च शिक्षणातील कालमर्यादेची चौकट संपुष्टात


'श्रेयांक बँक’ संकल्पना पुढील वर्षांपासून : विषय, कालावधी निवडीचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य

पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे अशा उच्चशिक्षणातील कालमर्यादेच्या चौकटी आता संपुष्टात येणार आहेत. विद्यार्थी विविध विषयांचे श्रेयांक साठवून त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी हे शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे आता पूर्ण करू शकतील. श्रेयांक साठवण्यासाठी ‘श्रेयांक बँके’ची संकल्पना पुढील वर्षांपासून अमलात आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मसुदा तयार केला आहे.

उच्च शिक्षणातील प्रमाणपत्रापासून ते पीएच.डीपर्यंतचे वेगवेगळे अभ्यास टप्पे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालमर्यादेचे बंधन राहणार नाही. हवे ते विषय शिकून त्याचे श्रेयांक विद्यार्थी साठवू शकतील. साठवलेले श्रेयांक गरजेनुसार वापरून वेगवेगळ्या टप्प्यातील शैक्षणिक मान्यता मिळवण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एका विषयाचे श्रेयांक विद्यार्थी सात वर्षांपर्यंत वापरू शकणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार ‘शैक्षणिक श्रेयांक बँक’ (अ‍ॅकॅडमिक क्रेडिट बँक) स्थापन करण्यासाठी आयोगाने मसुदा केला आहे. त्यामुळे विषय निवडीचे आणि कालमर्यादा निवडण्याचे स्वतंत्र्यही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोणत्याही टप्प्यावर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या श्रेयांकानुसार प्रमाणपत्र किंवा पदविका मिळू शकेल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२२) श्रेयांक बँक स्थापन होणार असून राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन प्रणालीकडून (नॅक) ‘अ’ श्रेणी मिळालेले महाविद्यालय किंवा विद्यापीठाला या योजनेत सहभागी होता येईल.

सध्या ढोबळपणे पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे, पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षे अशा कालमर्यादेच्या चौकटी आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमांत ठरावीक वर्षांत, ठरावीक विषय शिकण्याचेही बंधन आहे. आता विद्यार्थी त्यांना हवे ते विषय निवडून त्याचे श्रेयांक मिळवू शकतील. प्रत्येक विषयाचे श्रेयांक मिळवण्यासाठी ठरावीक तास शिक्षण पूर्ण करणे, प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. श्रेयांक बँकेतील खात्यात विद्यार्थी त्यांचे श्रेयांक जमा करू शकतील. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेले श्रेयांक खात्यात साठल्यावर विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार त्यांचा वापर करू शकतील. एका विषयाचे श्रेयांक सात वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतील. त्याचप्रमाणे एका विषयाचे श्रेयांक एका टप्प्यासाठी वापरल्यास ते दुसऱ्या टप्प्यासाठी वापरता येणार नाहीत.

विषय निवडीचे स्वातंत्र्य : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय आणि संस्था निवडण्याचे स्वातंत्र्य मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्याशाखांचे बंधन असणार नाही. ‘श्रेयांक बँके’शी जोडल्या गेलेल्या कोणत्याही संस्थेत विद्यार्थी शिकू शकतील. ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असेल तेथील अभ्यासक्रम आराखडय़ानुसार ५० ते ७० टक्के श्रेयांक आणि इतर विद्यापीठ किंवा संस्थेतून ३० ते ५० टक्के श्रेयांक विद्यार्थी मिळवू शकतील. एखाद्या विशिष्ट विद्याशाखेतील पदवी मिळवण्यासाठी त्या शाखेतील महत्त्वाच्या विषयांचे श्रेयांक मिळवणे बंधनकारक असेल. पदवी घेण्यासाठी पुरेसे श्रेयांक आहेत. परंतु ते एका कोणत्याही विशिष्ट शाखेतील नाहीत अशा विद्यार्थ्यांना पदवी हवी असल्यास ‘लिबरल आर्टस’मधील पदवी देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना कोणताही विषय, कुठेही शिकण्याचे आणि त्यासाठी कालावधीही ठरवण्याचे स्वातंत्र्य ‘अ‍ॅकॅडमिक क्रेडिट बँक’ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. देशाच्या उच्चशिक्षणातील येऊ घातलेल्या बदलांची ही नांदी आहे. या योजनेत सहभागी होऊनही त्याचे नियम न पाळणाऱ्या संस्थांवर कारवाईची तरतूदही मसुद्यात आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEW EDUCATION POLICY NEP-2020) pdf डाऊनलोड लिंक :


- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

- लोकसत्ता न्युज नेटवर्क


शनिवार, ३० जानेवारी, २०२१

भारतीय रिजर्व बैंक भरती - २०२१


1) RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत अधिकारी ग्रेड बी पदाच्या एकूण 322 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

पदाचे नाव – अधिकारी ग्रेड बी

पद संख्या – 322 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फीस

SC/ST/PwBD – रु. 100/-

GEN/OBC/EWSs – रु. 850/-

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट www.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021

 PDF जाहिरात : http://bit.ly/39nYRgA

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3cjqGZy

==================================

2) RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत) पदाच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत)

पद संख्या – 48 जागा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 फेब्रुवारी 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईटwww.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021

 PDF जाहिरात : http://bit.ly/2NOF0yV

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2Yf2Vtk

==================================

3) RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण 241 (मुंबई – 84, नागपूर – 12) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2021 आहे.

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक

पद संख्या – 241 जागा (मुंबई – 84, नागपूर – 12)

शैक्षणिक पात्रता – passed 10th Standard (S.S.C./Matriculation)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईटwww.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021

PDF जाहिरात : http://bit.ly/39XYbNY

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/39XYbNY

स्त्रोत - महाभरती

==================================

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

भारतीय पोस्ट विभाग भरती -२०२१



Indian Post Bharti 2021: 

     भारतीय डाक विभाग येथे ग्रामीण डाक सेवक  पदाच्या एकूण 233 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.

    अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. 

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • पद संख्या – 233 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • फीस –
    • OC/OBC/EWS Male / trans-man – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 जानेवारी 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

Indian Post Bharti 2021

🔘अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF Link जाहिरात वाचावी...


🔘 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा...

⭕ लिंक : https://appost.in/gdsonline/

स्रोत - महाभरती

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू होणार...


📝 बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू होणार....

वर्षभरात बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी बुधवारी केली. तसेच बालचित्रवाणीच्या संग्रहातील शिक्षणपूरक कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.

बालभारतीचा ५४ वा वर्धापन दिन आणि किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमात गायकवाड बोलत होत्या. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, साहित्यिक इंद्रजित भालेराव, नियंत्रक विवेक गोसावी, काँग्रेस नेते उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ‘किशोर’च्या मोबाइल अ‍ॅप आणि बोधचिन्ह, पन्नास किशोर गोष्टी हे पुस्तक, बालभारतीचे नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे बालरक्षक चळवळीतील अनुभवांवर आधारित ‘नवी पहाट’, प्रयोगशील शाळांची माहिती देणाऱ्या ‘शिक्षणाच्या नव्या वाटा’ या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. व्हच्र्युअल क्लासरूमच्या माध्यमातून राज्यभरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पाहिला.

बालभारती आणि किशोरचा आयुष्यावर खूप मोठा प्रभाव असल्याचे सांगून गायकवाड म्हणाल्या, की करोनामुळे निर्माण झालेल्या अडचणींतही न डगमगता बालभारतीने छपाई ते वितरणाचे काम केले. करोना हे आव्हान आहे, तशीच संधीही आहे. या निमित्ताने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. करोना काळात बालचित्रवाणीसारख्या शैक्षणिक वाहिनीची गरज जाणवली. त्यामुळे बालभारतीची स्वतंत्र वाहिनी वर्षभरात निर्माण करण्यात येईल. तसेच बालचित्रवाणीतील शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

⭕ किशोरची वर्गणी पन्नास रुपये

सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त बालवाचकांना भेट म्हणून किशोरची वार्षिक वर्गणी ५० रुपये करण्यात आली आहे. ५० रुपये वर्गणीत दिवाळी अंकासह वर्षभराचे अंक मिळतील. नवीन अ‍ॅप आणि संके तस्थळाद्वारे वार्षिक वर्गणी भरता येईल, असे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी सांगितले.

⭕ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन

राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या (डीआयईटी) प्रशिक्षित शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात येईल. समुपदेशकांची यादी जाहीर करण्यात येईल, असेही गायकवाड यांनी नमूद केले.

स्रोत - लोकसत्ता न्युज नेटवर्क

पदवीधरांना मोठी संधी–CAG च्या 10811 जागांसाठी भरती होणार.....


पदवीधरांना मोठी संधी – CAG च्या 10811 जागांसाठी भरती होणार..... 

CAG Recruitment 2021 : भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभाग – म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336) जागांसाठी भरती जाहिरात लवकरच येणार आहे . ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची “प्रतिक्रिया नोटीफिकेशन” cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे. 19 फेब्रुवारी 2021 ही टिप्पणी अर्ज करू शकतात. फक्त पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल. “या भरती संदर्भातील पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.”

पदाचे नाव – ऑडीटर आणि अकाऊंटट

पद संख्या – 10811 जागा (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336)

शैक्षणिक पात्रता – Graduate

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

टिप्पणी अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री व्ही. एस. वेंकटानाथन, सहाय्यक सी आणि एजी (एन), ओ / ओ सीएजी ऑफ इंडिया, 9, दिनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – 110124

टिप्पणी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – CAG Vacancies 2021

ऑडीटर - 6409

अकाऊंटट - 4402

सदर जाहिरातीची “प्रतिक्रिया नोटीफिकेशन” पीडीएफ डाउनलोड करा. 👇👇👇


अधिकृत वेबसाईट : cag.gov.in

नोट : ही भरती जाहिरात नाही आहे, सध्या फक्त आपल्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत, पूर्ण भरती जाहिराती लवकरच येणे अपेक्षित आहे. 

टीप : अशाच प्रकारे विविध प्रकारच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक विविध प्रकारची माहिती जाणून घेण्याकरिता या ब्लॉगला फॉलो करा.

स्रोत - महाभरती

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

पद्म पुरस्कार‌ जाहीर - २०२१


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारमार्फत पद्म पुरस्कार‌ जाहीर - २०२१

🔴 पार्श्वभूमी :-

🔰 26 जानेवारी 2021 रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

🔰 यंदाच्या पथप्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेशाच्या सैन्याची तुकडी आणि बॅंड. ऐतिहासिक मुक्तीच्या 50 वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिल्यांदाच बांगलादेशाच्या त्रि-सेवांमधील 122 सैनिकांची मार्चिंग तुकडी व बँडने पथप्रदर्शनामध्ये भाग घेतला.

🔰 राष्ट्रीय ध्वजाला 21 तोफांची सलामी दिल्यानंतर, लष्करातील पराक्रमी, शूर सैनिकांना शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. याप्रसंगी, दरवर्षीप्रमाणे देशातली लष्करी ताकद आणि विविध क्षेत्रातील कृत्ये, राज्यांमधील असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन, संरक्षण प्रणाली यांचे प्रजासत्ताक दिन पथप्रदर्शनामधून प्रदर्शित केले गेले.

🔰 प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटिश सरकारपासून स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ‘भारत सरकार कायदा-1935’ संपुष्टात येऊन भारताचे स्वतंत्र संविधान अस्तित्वात आले. भारत सार्वभौम झाला. तेव्हापासून भारत देश हा संविधानानुसार चालतो. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

◾️प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

◾️ महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

🔴 पद्मश्री :-

🔹 सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)

🔹 गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)

🔹 नामदेव कांबळे (साहित्य)

🔹 परशूराम गंगावणे (साहित्य)

🔹 जसवंती बेन जमनादास पोपट (उद्योग)

🔹 रजनीकांत श्रॉफ

 🔴 पद्मभूषण :-

🔹 समित्रा महाजन (माजी लोकसभा सभापती)

🔹 रामविलास पासवान (दिवंगत नेते, लोक जनशक्ती पक्ष)

🔹 तरुण गोगोई (दिवंगत नेते, आसामचे माजी मुख्यमंत्री)

🔹 कल्बे सादिक (दिवंगत मुस्लिम नेते)

🔴 पद्मविभूषण :-

🔹 शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान)

🔹 एस. पी. बालसुब्रमण्यम (दिवंगत, गायक-संगीतकार)

🔹 सदर्शन साहो (सँड आर्टिस्ट)

🔹 बी. बी. लाल (पुरातत्वशास्त्रज्ञ)

 ◾️ या यादीत २९ महिलांचा समावेश आहे. 

◾️ १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.


विशेष सेवेसाठी राज्यातील ५७ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

“शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची ४ पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची ४० पदके पटकावली आहेत. खास सेवेसाठी एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

तसेच, “पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने या सर्वांचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” असं म्हणत त्यांनी पदक मिळवणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन देखील केलं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा पदक विजेत्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन...



भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक....

‘महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे,' अशा शब्दांमध्ये मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुकही केलं आहे.

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दर वर्षी विशेष पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा देशभरातील ३२ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार - कामेश्वर वाघमारे (जि. नांदेड), नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) या पाच जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. त्याच्या या धाडसाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापुर्वीच कौतुक केले होते. त्याला या धाडसाबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. हेच आपल्या मुलांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून सिद्ध केले आहे. बहादुरीच्या आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. तसाच तो नवनिर्माण आणि प्रयोगशीलतेतही पुढेच आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहीली आहे. या क्षेत्रात आपली नवी पिढीही तितक्याच उमेदीने आणि पुढे जात आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, असेही म्हणावे वाटते. पुरस्कारप्राप्त या मुलांमध्ये ही जिद्द आणि चिकाटी निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय, पालक तसेच शिक्षक, मार्गदर्शकही कौतुकास पात्र आहेत. त्यासाठी या सर्वांचे आणि पुरस्कार विजेत्या मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा देतो, असं म्हणत सर्वांचेच कौतुक केलं आहे.

डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे?

डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया......

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल मतदान ओळखपत्र (Digital Voter Card) जारी करणार आहे. डिजीटल वोटर कार्ड आज (25 जानेवारी) अधिकृतपणे जारी केले जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यानंतर आता मतदान ओळखपत्रही डिजीटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. (ECI launches Digital Voter Card from 25th January know how to download)

पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी डिजीटल वोटर कार्डचे लाँचिंग

येत्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड

पहिल्या टप्प्यात 25 ते 31 जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे मतदार नव्याने नोंदणी करतील, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळेल.

मोबाईल नंबर रजिस्टर असल्यास 1 फेब्रुवारीपासून डिजीटल कार्ड

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना 1 फेब्रुवारीपासून डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरुपात मिळणार डिजीटल कार्ड

सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. मतदार आपले डिजीटल वोटर कार्ड डिजीलॉकर (Digilocker) मध्येही सेव्ह करुन ठेवू शकतात. (ECI launches Digital Voter Card from 25th January know how to download)

डिजीटल वोटर कार्ड कसे डाऊनलोड कराल?

https://voterportal.eci.gov.in/ किंवा https://nvsp.in/Account/Login 

या वेबसाईटवर लॉगइन करा....

वेबसाईटवर आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाऊंट तयार करा

 E-EPIC डाऊनलोड करा....

25 जानेवारीला सकाळी 11.14 वाजल्यापासून ही सुविधा उपलब्ध असेल.....

साभार - TV9

कविता - प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

 

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!


भारतीय संविधान सर्वमान्य राहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।। धृ।।


अजूनही कळाली ना लोकशाही।

अविचाराने फोफावली तानाशाही।।

न्यायासाठी जनता फोडतेय टाहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।१।।


खरचं झालो का आपण सार्वभौम।

जातीवादी प्रवृत्तीने लुटतेय कौम।।

स्वातंत्र्याची स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पाहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।२।।


मिळतेय कां समान दर्जा आणि संधी।

विद्येचा दिवा पेटला कां घराघरामंधी।।

आम्हां सर्वांच्या घरी सुखाचे दिन येवो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।३।।


चेतवा जनमनात संघर्षमय क्रांती।

भिमारायाने दिलीया बुद्धाची शांती।।

प्रज्ञा शील करुणेचा मार्ग दावो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।४।।


संविधानाचं सर्वांना मिळालं हो दानं।

ज्यामुळे मिळाले न्याय हक्क समान।। 

प्रवर्तन सर्वांचेच जयमंगल होवो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।५।।


कवी- संदिप अंबादास शेंडे (प्रा.शि)

         शासकीय माध्यमिक आश्रमशाळा

         कोलितमारा,ता.पारशिवनी,जि.नागपूर

मो.नं. ८३२९८९२९८४

सोमवार, २५ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair)

 


राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair 2021) च्या अनुषंगाने सहभाग घेणे, स्वनिर्मित खेळणीचे फोटो आणि व्हिडिओ लिंक भरणे व शेअर करणे.‌..

        विविध प्रकारचे खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देण्याच्या हेतूने आर्ट्स आणि अॅथेटिक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair 2021) ऑनलाइन पद्धतीने दिनांक 27/02/2021 ते 02/03/2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

        यामधील राज्यभरातील निवडक विद्यार्थी शिक्षक व अधिकारी यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष खेळणी किंवा डिजिटल ॲप्स यांचे फोटो व्हिडिओज आणि तपशील खालील लिंकवर भरावा.


👆👆👆वरील लिंकवर माहिती भरण्यासाठी अंतिम दि. 10/02/2021. 

      अधिक माहितीसाठी खाली दिलेले शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांचे परिपत्रक वाचा व डाऊनलोड करा.


केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त

जानेवारी २५ - केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त

मोबाइल अ‍ॅपद्वारे खासदार, नागरिकांना दस्तावेज....

अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाच्या संकलनाची सुरुवात ज्या कार्यक्रमाद्वारे केली जाते त्या प्रतीकात्मक ‘हलवा समारंभा’त शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर सहभागी झाले होते.

यंदा करोना निर्बंधांमुळे अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाची छपाई केली जाणार नसून खासदारांना त्याचे इलेक्ट्रॉनिक वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी हलवा कार्यक्रमाने अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती. स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पातील मिळकत आणि खर्च याबाबतचे दस्तऐवज, त्याचबरोबर वित्त विधेयक, नव्या करांबाबतचा सविस्तर तपशील आणि नव्या आर्थिक वर्षासाठीच्या अन्य उपाययोजनांबाबतच्या दस्तऐवजाची छपाई करण्यात येणार नाही. केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१-२२) यंदा प्रथमच कागदविरहित पद्धतीने सादर केला जाणार आहे. संसदेत १ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. खासदारांना आणि जनतेला अर्थसंकल्पाचा दस्तऐवज सहज उपलब्ध व्हावा यासाठी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल-अ‍ॅपसेवा सुरू केली आहे.

साभार - लोकसत्ता न्युज नेटवर्क

प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ‘कारागृह पर्यटन’


January 24, - प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ‘कारागृह पर्यटन’


भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असून या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.

भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्यसाधारण स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा, ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करून ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा कारागृहात कैदेत ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिद्ध असा पुणे करार येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुद्धा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. सन १८९९ मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली.

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टिकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमच ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील.

पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन मार्गदर्शक पुरविला जाईल. दररोज ५० पर्यटकांना भेटीची परवानगी देण्यात येणार आहे. ही योजना लवकरच राज्यातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

साभार - लोकसत्ता न्युज नेटवर्क

भारत - राज्य व त्यांचे स्थापना दिन

 


🇮🇳 भारत - राज्य व त्यांचे स्थापना दिन :-

🇮🇳 अरुणाचल प्रदेश : २० फेब्रुवारी

🇮🇳 मिझोरम : २० फेब्रुवारी

🇮🇳 आसाम : २ डिसेंबर

🇮🇳 बिहार : १२ मार्च

🇮🇳 आंध्रप्रदेश : १ नोव्हेंबर

🇮🇳 छत्तीसगड : १ नोव्हेंबर

🇮🇳 हरियाणा : १ नोव्हेंबर

🇮🇳 कर्नाटक : १ नोव्हेंबर

🇮🇳 केरळ : १ नोव्हेंबर

🇮🇳 मध्यप्रदेश : १ नोव्हेंबर

🇮🇳 पंजाब : १ नोव्हेंबर

🇮🇳 तमिळनाडू : १ नोव्हेंबर

🇮🇳 गोवा : ३० मे

🇮🇳 महाराष्ट्र : १ मे

🇮🇳 गुजरात : १ मे

🇮🇳 ओडिशा : १ एप्रिल

🇮🇳 हिमाचल प्रदेश : १५ एप्रिल

🇮🇳 झारखंड : १५ नोव्हेंबर

🇮🇳 मणिपूर : २१ जानेवारी 

🇮🇳 मेघालय : २१ जानेवारी

🇮🇳 त्रिपुरा : २१ जानेवारी

🇮🇳 नागालँड : १ डिसेंबर

🇮🇳 राजस्थान : ३० मार्च

🇮🇳 सिक्कीम : १६ मे

🇮🇳 तेलंगणा : २ जुन

🇮🇳 उत्तरप्रदेश : २५ जानेवारी

🇮🇳 उत्तराखंड : ९ नोव्हेंबर

🇮🇳 पश्चिम बंगाल : २० जुन .

- शैक्षणिक परिवर्तन


रविवार, २४ जानेवारी, २०२१

SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली!


SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा......

बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल.

कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहपरीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते. राज्यात नववी ते बारावीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. 18 जानेवारी रोजी 21,66,056 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, तर 21287 शाळा सुरू आहेत. सुमारे 76.8 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. हे उत्साहवर्धक चित्र आहे.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे व त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

स्त्रोत - ABP NEWS

महापोर्टल रद्द, नोकरभरतीसाठी सरकारकडून चार कंपन्यांची निवड...


महापोर्टल रद्द, नोकरभरतीसाठी सरकारकडून चार कंपन्यांची निवड....

राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8500 आणि पोलीस विभागातील पाच हजार 297 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांच्या मनात आशेचा किरण दिसला आहे. परंतु राज्य सरकार महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार आहे.

महापोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करुन राज्य सरकारने चार कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या आता भरती प्रक्रिया करणार आहेत. निवडण्यात आलेल्या चार कंपन्यांद्वारे इथून पुढे पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.


शासनचा निर्णयात काय म्हटलंय?


महापरीक्षा पोर्टल अतंर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करुन सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोवायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महा आयटी) यांच्याकडे देण्यात आली होती. त्या विभागानं निवड करुन सादर केलेल्या माहितीनुसार 4 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.


1. मेसर्स अॅपटेक लिमिटेड
2. मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रयाव्हेट लिमिटेड
3. मेसर्स जींजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड
4. मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड


या चार कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसी च्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

13 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी

राज्यातील या महाभरती प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पोलीस विभागात 5 हजार 297 पदं आणि आरोग्य विभागात 8 हजार 500 अशा एकूण 13 हजार 800 पदांची भरती होणार आहे. दरम्यान मराठा नेत्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे.

साभार - ABP न्युज नेटवर्क 




शनिवार, २३ जानेवारी, २०२१

पुन्हा एकदा नोटबंदी?


पुन्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु......


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.

यावेळी बी महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसंच उद्योजकांकडून स्वीकारलं गेलं नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे".

यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे.

- लोकसत्ता न्युज नेटवर्क

शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा.......

 



समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा.......

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता पायउतार झाले असले तरी त्यांनी त्याआधी सत्तांतर सुकरपणे घडू दिले नाही. प्रतिनिधिवृंदाच्या मतांची गणना सुरू असताना कॅपिटॉल हिल या अमेरिकी संसदेच्या इमारतीत त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. पण या लोकांची जमवाजमव करण्यात त्यांच्या ट्विटर खात्याची मदत झाली. त्यामुळे आता ट्विटर, फेसबुक, यू टय़ूब यांच्यासह सर्वानीच त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.

बंदी चांगली की वाईट?

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरही सुकरपणे होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी ट्विटरची मदत घेतली हे खरे, त्यामुळे त्या अर्थाने बंदी योग्यच आहे यात शंका नाही. पण यात एक वेगळा भाग असा, की समाजमाध्यम क्षेत्रातील रग्गड नफा कमावणाऱ्या कंपन्या लोकशाही देशांची प्रक्रिया चालवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात हेही यातून सिद्ध झाले आहे. एकीकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दुसरीकडे खोटय़ा बातम्या व द्वेषमूलक आशय काढून टाकणे ही तारेवरची कसरत होती. समाजमाध्यम कंपन्यांनी योग्य तेच केले असे काहींचे म्हणणे होते, तर दुसरीकडे यातून या कंपन्यांची सर्व लोकशाही प्रक्रिया किंवा एखाद्या बलाढय़ व्यवस्थेस, नेत्यास वाकवण्याची क्षमताही दिसून आली. युरोपीय समुदायात या कंपन्यांना वेगळे नियम आहेत त्यामुळे त्यांनी ट्रम्प यांना ट्विटरवरून काढण्याच्या मुद्दय़ावर टीका केली.

बंदी कशी घातली गेली?

फेसबुकने हल्ला झाला त्या सकाळीच त्यांचे खाते बंद केले. नंतर ट्विटर, स्नॅपचॅट, शॉपीफाय, ट्विच यांनीही बंदी घातली. ७ जानेवारीला फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर ट्रम्प यांचे खाते बंद केल्याचे स्पष्ट केले. प्रा. रमेश श्रीनिवासन यांच्या मते ट्विटर व फेसबुक यांनी, अध्यक्ष ट्रम्प हे सत्तेच्या हस्तांतरात गोंधळ घालू शकतात या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीच्या प्रतिसादाखातर ही बंदी घातली. आधी चार वर्षे त्यांनी हे सगळे खपवून घेतले; म्हणजे ही सोयीस्कर भूमिका होती. नंतर ट्रम्प यांना फक्त पार्लरची सेवा उपलब्ध होती, पण नंतर अ‍ॅपल, गूगल यांनी ते अ‍ॅप काढून टाकले. त्यातून अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेस या कंपनीची शक्तीच दिसून आली.

धोरण काय?

ट्विटरच्या धोरणानुसार कुठल्याही नागरी धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही. त्यात लोकांची दिशाभूल करणारी छायाचित्रे व मजकूर टाकता येत नाही. जनमत, जनगणना यासारख्या प्रक्रियांचा त्यात समावेश होतो. ट्विटर काही खात्यांवर स्वत: नजर ठेवते व खाते बंद करू शकते. काही तक्रारींवरून त्या खऱ्या वाटल्यास खाते बंद केले जाऊ शकते.

बचाव असा..

फेसबुक व ट्विटर यांनी असे म्हटले होते, की काही उच्चपदस्थ वापरकर्ते आमच्या धोरणाचे उल्लंघन करतात तेव्हा अशी कारवाई योग्यच ठरते. एरवी २०१९ मध्ये फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी असे म्हटले होते, की राजकीय नेते बातम्यांचा विषय देत असतात. त्याची चर्चा होत असते त्यामुळे त्यांना सूट देण्यात येत होती. ट्विटरने ट्रम्प यांना ‘ब्लॅक लाइव्हज मॅटरच्या वेळी जेव्हा लूट होते तेव्हा गोळीबार सुरू होतो’ या ट्विटरसाठी हटकले होते पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. ट्रम्प यांनी हिंसाचार करणाऱ्या समर्थकांना उत्तेजन देणारे ट्वीट केले होते व त्यांचे ८.८ कोटी अनुसारक त्यावर आहेत. कुठलाही बडा नेता आमच्या नियमांपेक्षा मोठा नाही असे ट्विटरने नंतर सांगितले व नंतर कायमचे त्यांचे खाते बंद केले. मिशेल ओबामा यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यम खाते बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे डेमोकॅट्र्सच्या सांगण्यावरून दबाव वाढला असे याबाबत सांगण्यात आले.

साभार - लोकसत्ता 

दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार...

 



🌀🌀दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार🌀🌀*

🍄भारत सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

🍄नेताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

🍄देशातल्या नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

🍁इतर ठळक बाबी

🍄नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात 23 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. कोलकता येथे आयोजित केलेल्या उत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.

🍄पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या स्मरणोत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.
नेताजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीट यांचे विमोचन केले जाणार आहे.

🍄ओडीशाच्या कटक येथे नेताजींच्या जन्मस्थळी देखील संस्कृती मंत्रालय एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

🍁नेताजी सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी 1897 – 18 ऑगस्ट 1945 ?)

🍄सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी आहे. त्यांचा जन्म कटकला (ओडीशा) येथे झाला.

🍄1927 साली ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी मिळून 1928 साली इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली.

🍄21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना  भारताच्या दिशेने पुढे गेल्या.

🍄सायगावहून 17 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर 18 ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते.

- शैक्षणिक परिवर्तन

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

पोलीस शिपाई पदे 100% भरण्याबाबत शासन निर्णय

 



📒 पोलीस भरती नवीन शासन निर्णय (GR) 📒*
 

◾️ राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मधील ५२९७ पदे पदे १००% भरण्यासाठी शासन निर्णयमधून सूट देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

◾️ या निर्णयाद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती करण्यात येत नसुन ही पदे मंजूर आकृतीबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात यावीत.

◾️ सन २०२० मधील एकुण ७२३१ (६७२६ अधिक ५०५ पदे) पद भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

शासन निर्णय डाउनलोड लिंक :-









शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रम(PSLM)

 


         

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या *राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL)* मार्फत तयार केलेल्या व *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद* द्वारे *मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत* केलेल्या *शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM)* औपचारिक सुरुवात *दिनांक ३ डिसेंबर २०२०* रोजी * मा. वंदना कृष्णा,* अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच *विशाल सोळंकी (भा.प्र.से.),* मा. आयुक्त शिक्षण, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पुणे यांच्या उपस्थितीत झालेली आहे. हा कार्यक्रम देशभरातील *प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख/पर्यवेक्षक/भावी मुख्याध्यापक तसेच भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक* यांच्यासाठी हा *ऑनलाईन कार्यक्रम* विनामूल्य उपलब्ध आहे. त्यानुसार राज्यभरातून सदर कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचे मनस्वी अभिनंदन.

              *दिनांक १३ जानेवारी २०२१* रोजी *राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा), नवी दिल्ली* यांचेकडून *जिल्हानिहाय झालेल्या नोंदणीचा अहवाल* या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. त्यानुसार राज्यभरातून १०५५३ नोंदणी झालेली आहे. यामध्ये *प्रथम क्रमांकावर कोल्हापूर जिल्ह्याची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे* तर *त्याखालोखाल सोलापूर, नागपूर, मुंबई उपनगर व जळगाव अनुक्रमे अशी आघाडीवर असलेली जिल्हे आहेत.* तर इतर जिल्ह्यांची नोंदणी अल्पप्रमाणात आहे. नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमिवर शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन यासोबतच शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांना या कार्यक्रमाचा लाभ व्हावा म्हणून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), प्राचार्य जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था तसेच सर्व संबंधितांनी आपआपल्या स्तरावरून नोंदणीसाठी आवाहन व प्रोत्साहित करावे. 

              जिल्हानिहाय PSLM COURSE साठी नोंदणी केलेल्या सहभागी यांची संख्या

*९०१ ते १००० दरम्यान असलेले जिल्हे :* कोल्हापूर

*८०१ ते ९०० दरम्यान असलेले जिल्हे :* सोलापूर

*७०१ ते ८०० दरम्यान असलेले जिल्हे :* निरंक

*६०१ ते ७०० दरम्यान असलेले जिल्हे :* सातारा जळगांव मुंबई (उपनगर) आणि नागपूर

*५०१ ते ६०० दरम्यान असलेले जिल्हे :* पुणे आणि अमरावती

*४०१ ते ५०० दरम्यान असलेले जिल्हे :* निरंक

*३०१ ते ४०० दरम्यान असलेले जिल्हे :* अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि ठाणे

*२०१ ते ३०० दरम्यान असलेले जिल्हे :* यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक, चंद्रपूर, सांगली, मुंबई (शहर), रायगड आणि नंदुरबार

*१०१ ते २०० दरम्यान असलेले जिल्हे :* जालना, रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बीड, बुलढाणा आणि पालघर

*० ते १०० दरम्यान असलेले जिल्हे :* वर्धा, धुळे, वाशीम, लातूर, अकोला, परभणी आणि गडचिरोली  

           👉🏻 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज 

https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315

तसेच

              👉YouTube चॅनेल लिंक 

https://youtu.be/g4MbLsJD5MA

              👉🏻 *PSLM कोर्स माहिती साठी YouTube link*

https://youtu.be/a6M_hLoielk

              👉🏻 शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (Program on School Leadership and Management - PSLM) ऑनलाइन स्वरूपातील व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा),* नवी दिल्ली *अधिकृत प्रमाणपत्र* देणारा कोर्स *मराठी, हिंदी व इंग्रजी* भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. हा कोर्स करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नसल्याने आपण आपल्या वेळेनुसार *२४x७* आपल्या *संगणक अथवा मोबाईलवर* देखील सहजपणे पूर्ण करू शकता. त्यासाठी पुढील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे आणि आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा.

              *Program for School Leadership and Management – PSLM नोंदणीसाठी करण्यासाठी वेबपोर्टल लिंक* 👇👇👇👇👇👇👇

http://pslm.niepa.ac.in/


              *फेसबुक पेज व YouTube channel* ला आपण *Like व Subscribe* केल्यामुळे आगामी व उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात *नोटिफिकेशन* मिळून अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.

              👉🏻 रजिस्ट्रेशन, लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत खालील तज्ञ व्यक्तींची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल.

*श्री. धनंजय क्षिरसागर* :- 98 6044 3300

*श्री. ओमप्रकाश शेळके* :- 98 2229 0630*      


प्रसारक : शैक्षणिक परिवर्तन         

माहिती तंत्रज्ञानाचे आवर्तन,चला करूया शैक्षणिक परिवर्तन....                                                                                     

       *डॉ. नेहा बेलसरे*

                 संचालक

       महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन 

व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद