Republic Day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Republic Day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

कविता - प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

 

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!


भारतीय संविधान सर्वमान्य राहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।। धृ।।


अजूनही कळाली ना लोकशाही।

अविचाराने फोफावली तानाशाही।।

न्यायासाठी जनता फोडतेय टाहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।१।।


खरचं झालो का आपण सार्वभौम।

जातीवादी प्रवृत्तीने लुटतेय कौम।।

स्वातंत्र्याची स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पाहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।२।।


मिळतेय कां समान दर्जा आणि संधी।

विद्येचा दिवा पेटला कां घराघरामंधी।।

आम्हां सर्वांच्या घरी सुखाचे दिन येवो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।३।।


चेतवा जनमनात संघर्षमय क्रांती।

भिमारायाने दिलीया बुद्धाची शांती।।

प्रज्ञा शील करुणेचा मार्ग दावो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।४।।


संविधानाचं सर्वांना मिळालं हो दानं।

ज्यामुळे मिळाले न्याय हक्क समान।। 

प्रवर्तन सर्वांचेच जयमंगल होवो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।५।।


कवी- संदिप अंबादास शेंडे (प्रा.शि)

         शासकीय माध्यमिक आश्रमशाळा

         कोलितमारा,ता.पारशिवनी,जि.नागपूर

मो.नं. ८३२९८९२९८४