national award लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
national award लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

पद्म पुरस्कार‌ जाहीर - २०२१


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारमार्फत पद्म पुरस्कार‌ जाहीर - २०२१

🔴 पार्श्वभूमी :-

🔰 26 जानेवारी 2021 रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

🔰 यंदाच्या पथप्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेशाच्या सैन्याची तुकडी आणि बॅंड. ऐतिहासिक मुक्तीच्या 50 वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिल्यांदाच बांगलादेशाच्या त्रि-सेवांमधील 122 सैनिकांची मार्चिंग तुकडी व बँडने पथप्रदर्शनामध्ये भाग घेतला.

🔰 राष्ट्रीय ध्वजाला 21 तोफांची सलामी दिल्यानंतर, लष्करातील पराक्रमी, शूर सैनिकांना शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. याप्रसंगी, दरवर्षीप्रमाणे देशातली लष्करी ताकद आणि विविध क्षेत्रातील कृत्ये, राज्यांमधील असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन, संरक्षण प्रणाली यांचे प्रजासत्ताक दिन पथप्रदर्शनामधून प्रदर्शित केले गेले.

🔰 प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटिश सरकारपासून स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ‘भारत सरकार कायदा-1935’ संपुष्टात येऊन भारताचे स्वतंत्र संविधान अस्तित्वात आले. भारत सार्वभौम झाला. तेव्हापासून भारत देश हा संविधानानुसार चालतो. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

◾️प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

◾️ महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

🔴 पद्मश्री :-

🔹 सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)

🔹 गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)

🔹 नामदेव कांबळे (साहित्य)

🔹 परशूराम गंगावणे (साहित्य)

🔹 जसवंती बेन जमनादास पोपट (उद्योग)

🔹 रजनीकांत श्रॉफ

 🔴 पद्मभूषण :-

🔹 समित्रा महाजन (माजी लोकसभा सभापती)

🔹 रामविलास पासवान (दिवंगत नेते, लोक जनशक्ती पक्ष)

🔹 तरुण गोगोई (दिवंगत नेते, आसामचे माजी मुख्यमंत्री)

🔹 कल्बे सादिक (दिवंगत मुस्लिम नेते)

🔴 पद्मविभूषण :-

🔹 शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान)

🔹 एस. पी. बालसुब्रमण्यम (दिवंगत, गायक-संगीतकार)

🔹 सदर्शन साहो (सँड आर्टिस्ट)

🔹 बी. बी. लाल (पुरातत्वशास्त्रज्ञ)

 ◾️ या यादीत २९ महिलांचा समावेश आहे. 

◾️ १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.


विशेष सेवेसाठी राज्यातील ५७ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

“शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची ४ पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची ४० पदके पटकावली आहेत. खास सेवेसाठी एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

तसेच, “पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने या सर्वांचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” असं म्हणत त्यांनी पदक मिळवणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन देखील केलं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा पदक विजेत्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन...



भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक....

‘महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे,' अशा शब्दांमध्ये मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुकही केलं आहे.

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दर वर्षी विशेष पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा देशभरातील ३२ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार - कामेश्वर वाघमारे (जि. नांदेड), नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) या पाच जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. त्याच्या या धाडसाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापुर्वीच कौतुक केले होते. त्याला या धाडसाबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. हेच आपल्या मुलांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून सिद्ध केले आहे. बहादुरीच्या आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. तसाच तो नवनिर्माण आणि प्रयोगशीलतेतही पुढेच आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहीली आहे. या क्षेत्रात आपली नवी पिढीही तितक्याच उमेदीने आणि पुढे जात आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, असेही म्हणावे वाटते. पुरस्कारप्राप्त या मुलांमध्ये ही जिद्द आणि चिकाटी निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय, पालक तसेच शिक्षक, मार्गदर्शकही कौतुकास पात्र आहेत. त्यासाठी या सर्वांचे आणि पुरस्कार विजेत्या मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा देतो, असं म्हणत सर्वांचेच कौतुक केलं आहे.