शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा.......

 



समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा.......

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता पायउतार झाले असले तरी त्यांनी त्याआधी सत्तांतर सुकरपणे घडू दिले नाही. प्रतिनिधिवृंदाच्या मतांची गणना सुरू असताना कॅपिटॉल हिल या अमेरिकी संसदेच्या इमारतीत त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. पण या लोकांची जमवाजमव करण्यात त्यांच्या ट्विटर खात्याची मदत झाली. त्यामुळे आता ट्विटर, फेसबुक, यू टय़ूब यांच्यासह सर्वानीच त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.

बंदी चांगली की वाईट?

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरही सुकरपणे होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी ट्विटरची मदत घेतली हे खरे, त्यामुळे त्या अर्थाने बंदी योग्यच आहे यात शंका नाही. पण यात एक वेगळा भाग असा, की समाजमाध्यम क्षेत्रातील रग्गड नफा कमावणाऱ्या कंपन्या लोकशाही देशांची प्रक्रिया चालवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात हेही यातून सिद्ध झाले आहे. एकीकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दुसरीकडे खोटय़ा बातम्या व द्वेषमूलक आशय काढून टाकणे ही तारेवरची कसरत होती. समाजमाध्यम कंपन्यांनी योग्य तेच केले असे काहींचे म्हणणे होते, तर दुसरीकडे यातून या कंपन्यांची सर्व लोकशाही प्रक्रिया किंवा एखाद्या बलाढय़ व्यवस्थेस, नेत्यास वाकवण्याची क्षमताही दिसून आली. युरोपीय समुदायात या कंपन्यांना वेगळे नियम आहेत त्यामुळे त्यांनी ट्रम्प यांना ट्विटरवरून काढण्याच्या मुद्दय़ावर टीका केली.

बंदी कशी घातली गेली?

फेसबुकने हल्ला झाला त्या सकाळीच त्यांचे खाते बंद केले. नंतर ट्विटर, स्नॅपचॅट, शॉपीफाय, ट्विच यांनीही बंदी घातली. ७ जानेवारीला फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर ट्रम्प यांचे खाते बंद केल्याचे स्पष्ट केले. प्रा. रमेश श्रीनिवासन यांच्या मते ट्विटर व फेसबुक यांनी, अध्यक्ष ट्रम्प हे सत्तेच्या हस्तांतरात गोंधळ घालू शकतात या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीच्या प्रतिसादाखातर ही बंदी घातली. आधी चार वर्षे त्यांनी हे सगळे खपवून घेतले; म्हणजे ही सोयीस्कर भूमिका होती. नंतर ट्रम्प यांना फक्त पार्लरची सेवा उपलब्ध होती, पण नंतर अ‍ॅपल, गूगल यांनी ते अ‍ॅप काढून टाकले. त्यातून अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेस या कंपनीची शक्तीच दिसून आली.

धोरण काय?

ट्विटरच्या धोरणानुसार कुठल्याही नागरी धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही. त्यात लोकांची दिशाभूल करणारी छायाचित्रे व मजकूर टाकता येत नाही. जनमत, जनगणना यासारख्या प्रक्रियांचा त्यात समावेश होतो. ट्विटर काही खात्यांवर स्वत: नजर ठेवते व खाते बंद करू शकते. काही तक्रारींवरून त्या खऱ्या वाटल्यास खाते बंद केले जाऊ शकते.

बचाव असा..

फेसबुक व ट्विटर यांनी असे म्हटले होते, की काही उच्चपदस्थ वापरकर्ते आमच्या धोरणाचे उल्लंघन करतात तेव्हा अशी कारवाई योग्यच ठरते. एरवी २०१९ मध्ये फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी असे म्हटले होते, की राजकीय नेते बातम्यांचा विषय देत असतात. त्याची चर्चा होत असते त्यामुळे त्यांना सूट देण्यात येत होती. ट्विटरने ट्रम्प यांना ‘ब्लॅक लाइव्हज मॅटरच्या वेळी जेव्हा लूट होते तेव्हा गोळीबार सुरू होतो’ या ट्विटरसाठी हटकले होते पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. ट्रम्प यांनी हिंसाचार करणाऱ्या समर्थकांना उत्तेजन देणारे ट्वीट केले होते व त्यांचे ८.८ कोटी अनुसारक त्यावर आहेत. कुठलाही बडा नेता आमच्या नियमांपेक्षा मोठा नाही असे ट्विटरने नंतर सांगितले व नंतर कायमचे त्यांचे खाते बंद केले. मिशेल ओबामा यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यम खाते बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे डेमोकॅट्र्सच्या सांगण्यावरून दबाव वाढला असे याबाबत सांगण्यात आले.

साभार - लोकसत्ता 

दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार...

 



🌀🌀दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार🌀🌀*

🍄भारत सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

🍄नेताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

🍄देशातल्या नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

🍁इतर ठळक बाबी

🍄नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात 23 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. कोलकता येथे आयोजित केलेल्या उत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.

🍄पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या स्मरणोत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.
नेताजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीट यांचे विमोचन केले जाणार आहे.

🍄ओडीशाच्या कटक येथे नेताजींच्या जन्मस्थळी देखील संस्कृती मंत्रालय एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

🍁नेताजी सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी 1897 – 18 ऑगस्ट 1945 ?)

🍄सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी आहे. त्यांचा जन्म कटकला (ओडीशा) येथे झाला.

🍄1927 साली ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी मिळून 1928 साली इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली.

🍄21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना  भारताच्या दिशेने पुढे गेल्या.

🍄सायगावहून 17 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर 18 ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते.

- शैक्षणिक परिवर्तन

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

पोलीस शिपाई पदे 100% भरण्याबाबत शासन निर्णय

 



📒 पोलीस भरती नवीन शासन निर्णय (GR) 📒*
 

◾️ राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मधील ५२९७ पदे पदे १००% भरण्यासाठी शासन निर्णयमधून सूट देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

◾️ या निर्णयाद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती करण्यात येत नसुन ही पदे मंजूर आकृतीबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात यावीत.

◾️ सन २०२० मधील एकुण ७२३१ (६७२६ अधिक ५०५ पदे) पद भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

शासन निर्णय डाउनलोड लिंक :-









शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रम(PSLM)

 


         

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या *राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL)* मार्फत तयार केलेल्या व *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद* द्वारे *मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत* केलेल्या *शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM)* औपचारिक सुरुवात *दिनांक ३ डिसेंबर २०२०* रोजी * मा. वंदना कृष्णा,* अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच *विशाल सोळंकी (भा.प्र.से.),* मा. आयुक्त शिक्षण, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पुणे यांच्या उपस्थितीत झालेली आहे. हा कार्यक्रम देशभरातील *प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख/पर्यवेक्षक/भावी मुख्याध्यापक तसेच भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक* यांच्यासाठी हा *ऑनलाईन कार्यक्रम* विनामूल्य उपलब्ध आहे. त्यानुसार राज्यभरातून सदर कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचे मनस्वी अभिनंदन.

              *दिनांक १३ जानेवारी २०२१* रोजी *राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा), नवी दिल्ली* यांचेकडून *जिल्हानिहाय झालेल्या नोंदणीचा अहवाल* या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. त्यानुसार राज्यभरातून १०५५३ नोंदणी झालेली आहे. यामध्ये *प्रथम क्रमांकावर कोल्हापूर जिल्ह्याची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे* तर *त्याखालोखाल सोलापूर, नागपूर, मुंबई उपनगर व जळगाव अनुक्रमे अशी आघाडीवर असलेली जिल्हे आहेत.* तर इतर जिल्ह्यांची नोंदणी अल्पप्रमाणात आहे. नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमिवर शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन यासोबतच शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांना या कार्यक्रमाचा लाभ व्हावा म्हणून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), प्राचार्य जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था तसेच सर्व संबंधितांनी आपआपल्या स्तरावरून नोंदणीसाठी आवाहन व प्रोत्साहित करावे. 

              जिल्हानिहाय PSLM COURSE साठी नोंदणी केलेल्या सहभागी यांची संख्या

*९०१ ते १००० दरम्यान असलेले जिल्हे :* कोल्हापूर

*८०१ ते ९०० दरम्यान असलेले जिल्हे :* सोलापूर

*७०१ ते ८०० दरम्यान असलेले जिल्हे :* निरंक

*६०१ ते ७०० दरम्यान असलेले जिल्हे :* सातारा जळगांव मुंबई (उपनगर) आणि नागपूर

*५०१ ते ६०० दरम्यान असलेले जिल्हे :* पुणे आणि अमरावती

*४०१ ते ५०० दरम्यान असलेले जिल्हे :* निरंक

*३०१ ते ४०० दरम्यान असलेले जिल्हे :* अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि ठाणे

*२०१ ते ३०० दरम्यान असलेले जिल्हे :* यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक, चंद्रपूर, सांगली, मुंबई (शहर), रायगड आणि नंदुरबार

*१०१ ते २०० दरम्यान असलेले जिल्हे :* जालना, रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बीड, बुलढाणा आणि पालघर

*० ते १०० दरम्यान असलेले जिल्हे :* वर्धा, धुळे, वाशीम, लातूर, अकोला, परभणी आणि गडचिरोली  

           👉🏻 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज 

https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315

तसेच

              👉YouTube चॅनेल लिंक 

https://youtu.be/g4MbLsJD5MA

              👉🏻 *PSLM कोर्स माहिती साठी YouTube link*

https://youtu.be/a6M_hLoielk

              👉🏻 शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (Program on School Leadership and Management - PSLM) ऑनलाइन स्वरूपातील व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा),* नवी दिल्ली *अधिकृत प्रमाणपत्र* देणारा कोर्स *मराठी, हिंदी व इंग्रजी* भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. हा कोर्स करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नसल्याने आपण आपल्या वेळेनुसार *२४x७* आपल्या *संगणक अथवा मोबाईलवर* देखील सहजपणे पूर्ण करू शकता. त्यासाठी पुढील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे आणि आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा.

              *Program for School Leadership and Management – PSLM नोंदणीसाठी करण्यासाठी वेबपोर्टल लिंक* 👇👇👇👇👇👇👇

http://pslm.niepa.ac.in/


              *फेसबुक पेज व YouTube channel* ला आपण *Like व Subscribe* केल्यामुळे आगामी व उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात *नोटिफिकेशन* मिळून अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.

              👉🏻 रजिस्ट्रेशन, लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत खालील तज्ञ व्यक्तींची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल.

*श्री. धनंजय क्षिरसागर* :- 98 6044 3300

*श्री. ओमप्रकाश शेळके* :- 98 2229 0630*      


प्रसारक : शैक्षणिक परिवर्तन         

माहिती तंत्रज्ञानाचे आवर्तन,चला करूया शैक्षणिक परिवर्तन....                                                                                     

       *डॉ. नेहा बेलसरे*

                 संचालक

       महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन 

व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी संविधान वाचन


 

शासन निर्णय महाराष्ट्र शासन :- 26 जानेवारी प्रजासत्ताक/गणतंत्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी उद्देशिका संविधान वाचन करणे.....








बुधवार, २० जानेवारी, २०२१

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजय....


अभूतपूर्व कामगिरीसह भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजय....


अविस्मरणीय..

विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये मंगळवारी पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व विजय नोंदवला. नवागतांचा भरणा असूनही अजिंक्य रहाणेच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत मुरब्बी यजमानांना धूळ चारली आणि हा विजय अविस्मरणीय ठरला.

शुभमन गिल (९१) आणि ऋषभ पंतच्या (८९ नाबाद) नीडर फटकेबाजीला चेतेश्वर पुजाराच्या (५६) भक्कम फलंदाजीची साथ मिळाली आणि ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर ४३ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभवाची झळ लागली. मालिकेत २-१ अशा विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर करंडक राखलाच, शिवाय आयसीसी कसोटी स्पर्धा गुणतक्त्यात अव्वल स्थानावरही झेप घेतली.

लक्षावधी क्रिकेट रसिक आणि माजी क्रिकेटपटू तसेच विश्लेषकांच्या मते भारताचा हा कसोटी इतिहासातील सर्वोत्तम विजय ठरला. सामन्यातील भारताचे पाचही गोलंदाज - सिराज, ठाकूर, सैनी, नटराजन, सुंदर - अत्यंत अननुभवी होते. तरीही त्यांनी या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी गारद करून दाखवले. शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची पहिल्या डावातील १२३ धावांची विक्रमी भागीदारी या सामन्यात भारतीय आव्हान जिवंत ठेवण्यात अत्यंत मोलाची ठरली. खरे तर हा कसोटी सामना अनिर्णीत ठेवूनही भागण्यासारखे होते, कारण बॉर्डर-गावस्कर करंडक तरीही भारताला राखता आला असता. पण शेवटच्या दिवशी भारतीय संघाने बचावात्मक मानसिकतेलाच तिलांजली दिली होती. पुजाराने एक बाजू लावून धरल्यावर शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर, मयांक अगरवाल आणि अखेरीस ऋषभ पंतने आक्रमक खेळून ऑस्ट्रेलियाला संधीच दिली नाही. गॅबा मैदानावर यापूर्वी चौथ्या डावात कोणत्याही संघाला २००हून अधिक धावा विजयासाठी बनवता आल्या नव्हत्या. तो इतिहास मंगळवारी पुसला गेला.

भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. ती ०-४ अशी गमवावी लागणार असा अंदाज भल्याभल्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी व्यक्त केला होता. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांमध्ये उखडले गेल्यानंतर कोणीही भारताला फारशी संधी देऊ इच्छित नव्हते. त्यातच कर्णधार विराट कोहली उर्वरित मालिकेत खेळणार नव्हता आणि भारताचे सर्व प्रमुख गोलंदाज, तसेच दोन मधल्या फळीतील फलंदाज जायबंदी होत गेले. तशाही परिस्थितीत मेलबर्न कसोटीत संस्मरणीय विजय, सिडनी कसोटी जिगरबाज खेळून अनिर्णीत राखणे आणि ब्रिस्बेन कसोटीत ऐतिहासिक विजय अशी कामगिरी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने करून दाखवली. हे घडत असताना समोर ऑस्ट्रेलियन संघ मात्र जवळपास सर्व सामने पूर्ण क्षमतेने खेळला, हे विशेष.

भारतीय क्रिकेटसाठी हा अत्यंत जादुई क्षण आहे. या युवा संघाला सामना केवळ वाचवायचा नव्हता, तर तो जिंकून मालिकेचा शेवट धडाकेबाज करायचा होता. हा युवा भारताचा विजय आहे. युवा भारत कोणालाही घाबरत नसल्याचा हा पुरावा आहे.

- सुनील गावस्कर, विख्यात माजी फलंदाज व कर्णधार

साभार - लोकसत्ता 

"Google tools for education"(MSCERT)


राज्यातील सर्व शिक्षकांसाठी शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा आयोजित वेबिनार.....

"Google tools for education"



सर्व शिक्षकांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी.....


नोंदणी लिंक : https://tinyurl.com/y5ozz209