गुरुवार, २१ जानेवारी, २०२१
बुधवार, २० जानेवारी, २०२१
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजय....
अभूतपूर्व कामगिरीसह भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजय....
अविस्मरणीय..
विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये मंगळवारी पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व विजय नोंदवला. नवागतांचा भरणा असूनही अजिंक्य रहाणेच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत मुरब्बी यजमानांना धूळ चारली आणि हा विजय अविस्मरणीय ठरला.
शुभमन गिल (९१) आणि ऋषभ पंतच्या (८९ नाबाद) नीडर फटकेबाजीला चेतेश्वर पुजाराच्या (५६) भक्कम फलंदाजीची साथ मिळाली आणि ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर ४३ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभवाची झळ लागली. मालिकेत २-१ अशा विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर करंडक राखलाच, शिवाय आयसीसी कसोटी स्पर्धा गुणतक्त्यात अव्वल स्थानावरही झेप घेतली.
लक्षावधी क्रिकेट रसिक आणि माजी क्रिकेटपटू तसेच विश्लेषकांच्या मते भारताचा हा कसोटी इतिहासातील सर्वोत्तम विजय ठरला. सामन्यातील भारताचे पाचही गोलंदाज - सिराज, ठाकूर, सैनी, नटराजन, सुंदर - अत्यंत अननुभवी होते. तरीही त्यांनी या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी गारद करून दाखवले. शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची पहिल्या डावातील १२३ धावांची विक्रमी भागीदारी या सामन्यात भारतीय आव्हान जिवंत ठेवण्यात अत्यंत मोलाची ठरली. खरे तर हा कसोटी सामना अनिर्णीत ठेवूनही भागण्यासारखे होते, कारण बॉर्डर-गावस्कर करंडक तरीही भारताला राखता आला असता. पण शेवटच्या दिवशी भारतीय संघाने बचावात्मक मानसिकतेलाच तिलांजली दिली होती. पुजाराने एक बाजू लावून धरल्यावर शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर, मयांक अगरवाल आणि अखेरीस ऋषभ पंतने आक्रमक खेळून ऑस्ट्रेलियाला संधीच दिली नाही. गॅबा मैदानावर यापूर्वी चौथ्या डावात कोणत्याही संघाला २००हून अधिक धावा विजयासाठी बनवता आल्या नव्हत्या. तो इतिहास मंगळवारी पुसला गेला.
भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. ती ०-४ अशी गमवावी लागणार असा अंदाज भल्याभल्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी व्यक्त केला होता. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांमध्ये उखडले गेल्यानंतर कोणीही भारताला फारशी संधी देऊ इच्छित नव्हते. त्यातच कर्णधार विराट कोहली उर्वरित मालिकेत खेळणार नव्हता आणि भारताचे सर्व प्रमुख गोलंदाज, तसेच दोन मधल्या फळीतील फलंदाज जायबंदी होत गेले. तशाही परिस्थितीत मेलबर्न कसोटीत संस्मरणीय विजय, सिडनी कसोटी जिगरबाज खेळून अनिर्णीत राखणे आणि ब्रिस्बेन कसोटीत ऐतिहासिक विजय अशी कामगिरी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने करून दाखवली. हे घडत असताना समोर ऑस्ट्रेलियन संघ मात्र जवळपास सर्व सामने पूर्ण क्षमतेने खेळला, हे विशेष.
भारतीय क्रिकेटसाठी हा अत्यंत जादुई क्षण आहे. या युवा संघाला सामना केवळ वाचवायचा नव्हता, तर तो जिंकून मालिकेचा शेवट धडाकेबाज करायचा होता. हा युवा भारताचा विजय आहे. युवा भारत कोणालाही घाबरत नसल्याचा हा पुरावा आहे.
- सुनील गावस्कर, विख्यात माजी फलंदाज व कर्णधार
साभार - लोकसत्ता
"Google tools for education"(MSCERT)
राज्यातील सर्व शिक्षकांसाठी शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा आयोजित वेबिनार.....
"Google tools for education"
सर्व शिक्षकांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी.....
नोंदणी लिंक : https://tinyurl.com/y5ozz209
मंगळवार, १९ जानेवारी, २०२१
आरोग्य विभाग पदभरती जाहिरात
२) आरोग्य विभाग पद भर्ती अभ्यासक्रम (गट - क)
सोमवार, १८ जानेवारी, २०२१
*भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी स्नेसारेव्ह.....*
शैक्षणिक परिवर्तन वार्ताहर -
भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी स्नेसारेव्ह.....
बेलारूसच्या निकोलाय स्नेसारेव्ह यांची भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) नियुक्ती केली आहे. दोन वर्षेआधी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्नेसारेव्ह यांची सप्टेंबपर्यंत पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.
मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंना ते मार्गदर्शन करतील. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ३००० मीटर स्टिपलचेस धावपटू अविनाश साबळेला ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच ऑलिम्पिककरिता पात्र ठरण्यासाठी उत्सुक असलेल्यांनाही ते मार्गदर्शन करतील.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी स्नेसारेव्ह यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. ‘‘स्नेसारेव्ह यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची साबळेची इच्छा होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साबळेची कामगिरी उंचावण्याची आशा आहे,’’ असे सुमारीवाला म्हणाले.
‘‘भारतासोबत याआधी स्नेसारेव्ह यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळे ललिता बाबर हिला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अव्वल १० जणांमध्ये धडक मारता आली. त्याचबरोबर सुधा सिंह हिनेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम कामगिरी केली आहे,’’ असेही सुमारीवाला यांनी सांगितले. २००५पासून स्नेसारेव्ह भारतीय अॅथलेटिक्सशी जोडले गेले आहेत.
*माहिती-तंत्रज्ञानाचे आवर्तन,
*चला करूया शैक्षणिक परिवर्तन*
❀✧══════•❁❀❁•══════✧❀
रविवार, १७ जानेवारी, २०२१
दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताचा आठ-कलमी कृती आराखडा......
![]() |
दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताचा आठ-कलमी कृती आराखडा......
शैक्षणिक परिवर्तन वार्ताहर -
📉12 जानेवारी 2021 रोजी दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची (UNSC) 'ठराव 1373 स्वीकारल्यापासून 20 वर्षानंतर दहशतवादाविरोधातल्या लढाईत आंतरराष्ट्रीय सहकार्य' या विषयावर खुली चर्चा झाली. चर्चेत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भाग घेतला.
📉दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून झालेल्या या चर्चेत डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि प्रभावी कारवाईची खात्री करण्यासाठी आठ-कलमी कृती आराखड्याचा प्रस्ताव मांडला.
📉1 जानेवारी 2021 रोजी भारताने UNSCचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची ही पहिली वेळ होती.
📕 भारताचा आठ-कलमी कृती आराखडा.....
📉दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करणे आवश्यक आहे आणि या लढाईत कुठल्याही प्रकारचा आक्षेप होता कामा नये.
सर्व सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी करार आणि साधनांमधील आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
📉या लढाईत कोणतेही दुहेरी मापदंड असू नयेत, दहशतवादी हे दहशतवादी असतात आणि त्यात वाईट किंवा चांगला असा कोणताही फरक नसतो.निर्बंध आणि दहशतवादाविरोधात काम करणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे.
📉जगात फूट पाडण्याच्या हेतूने आणि सामाजिक जडणघडणीला इजा पोहचविणार्या बहिष्कृतवादी विचारसरणाला आंतरराष्ट्रीय समुदायाने ठामपणे परावृत्त केले पाहिजे.
📉संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध लागू करण्याविषयीची संस्था आणि व्यक्तींची यादी वस्तुनिष्ठपणे केले जाणे आवश्यक आहे आणि यासंदर्भातल्या प्रस्तावांचे अभिसरण करण्यापूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे.
📉दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटीत गुन्हेगारी ओळखणे आवश्यक आहे आणि कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे.
📉दहशतवादाला होणारेपुरवीला जाणारा निधी ही एक मोठी समस्या आहे.दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांना होणारा वित्त पुरवठा खंडीत करणे गरजेचे आहे.
📉फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) संस्थेने पैश्यांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी कमतरता ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी संस्थांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक परिवर्तन
*माहिती-तंत्रज्ञानाचे आवर्तन,*
*चला करूया शैक्षणिक परिवर्तन*
❀✧══════•❁❀❁•══════✧❀














