बुधवार, १९ मे, २०२१

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी :- पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा शासननिर्णय मागे...

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी :- पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा शासननिर्णय मागे...

 *पदोन्नतीतील आरक्षणावरून उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी धारण केला रुद्रावतार*

*संतप्त राऊतांसमोर सरकार नरमले*

*7 मे च्या जी आरची सध्या होणार नाही अमंलबजावणी*

एसीएस गोळा करणार Quantifiable आकडेवारी

विधी व न्याय विभागाचे मत पुन्हा मागितले

आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोबतच्या बैठकीत नितीन राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षणावरून त्यांना धारेवर धरले. मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच 7 मे चा जी आर कसा काढण्यात आला? जरनेल सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण देण्यास हरकत नाही असे स्पष्ट केले असताना या आरक्षणाला राज्यात हरकत घेणारे कोण आहेत?

कर्नाटकमधील पदोन्नतीतील आरक्षण आकडेवारी दिल्यानंतर वैध ठरले असताना हे आरक्षण अवैध असल्याची भूमिका राज्यात का घेतली जातेय?

मंत्रिमंडळ उपसमितीने एसीएस च्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असताना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती का नेमण्यात आली? विधी व न्याय विभागाच्या प्रतिकूल मताचा हवाला देऊन पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले असेल तर हा अभिप्राय खूप जुना असून त्यानंतर फेब्रुवारी 21,एप्रिल 21 मध्ये पदोन्नतीत आरक्षण देणारे जी आर आपल्या सरकारने कसे काढले ? जरनेलं सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानतर केंद्र सरकारच्या डिओपोटी विभागाने पदोन्नतीतील आरक्षण लागू करणारे आदेश जारी केले आहेत. ही वस्तुस्थिती का दुर्लक्षित केली जातेय?

 असे प्रश्न विचारून संतप्त मंत्री राऊत यांनी आज सरकार आणि उपमुख्यमंत्री यांना चांगलेच सुनावले. 

 आज त्यांनी रौद्ररूप धारण केले होते. त्यांच्या आक्रमकतेमुळे अखेर राज्य सरकारने 7 मे च्या जी आर ची सध्या अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे..या विषयावर पून्हा एकदा विधी व न्याय विभागाचे मत मागण्याचा निर्णय झाला आहे.

 या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सह एसीएस सुजाता सौनिक, किशोर राजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे सचिव देशमुख उपस्थित होते.

*ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षण या विषयाच्या समर्थनार्थ खालील मुद्दे आजच्या बैठकीत मांडले*: 

मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीत आरक्षण महत्वाचे मुद्दे १. ७७ वी व ८५ वी घटना दुरुस्ती लक्षात घेऊन महाराष्ट्रात आरक्षण कायदा-२००१ मंजूर होऊन पदोन्नतीमधील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांवर लागू करण्यात आले. २. विजय घोगरे विरुध्द महाराष्ट्र शासन रिट याचिका क्र. २७९७/२०१५ संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांवर लागू करण्याबाबतचा दि. २५ मे २००४ चा शासन निर्णय दि ०४ ऑगस्ट २०१७ रोजी रद्द केला.

३. एम. नागराज (१९.१०.२००६) या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मागासलेपणा, अपर्याप्त प्रतिनिधीत्व व प्रशासनाची कार्यक्षमता या अटींची पुर्तता न केल्यामुळे सदर शासननिर्णय अवैध्य असल्याचे सांगून १२ आठवडयांच्या कालावधीत सुधारात्मक उपाययोजना (Corrective Steps/ measures) करण्याबाबत उच्च न्यायालयातर्फे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. २८ मार्च, २००८ च्या निर्णयानुसार विमुक्त भटक्या जाती व विशेष मागासवर्गीयांचे १३ टक्के आरक्षणास मंजुरी असल्याचेही आदेशात नमुद करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दि. १८ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयास बांधील राहून पदोन्नतीमधील आरक्षणास मागासवर्गीय कर्मचारी/ अधिकारी यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती देण्याचे ठरविण्यात आले.तथापि, दि. २९.१२.२०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण बंद करुन दि. २५.०५.२००४ नंतर आरक्षणांतर्गत पदोन्नती मिळालेल्या मागासवर्गीय कर्मचारी/ अधिकारी यांना खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती नाकारण्यात आली.

६. त्यानंतर दि. १८ फेब्रुवारी, २०२१ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीची सर्व १०० टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आर. के. सबर्वाल (१९९५) या निर्णयाविरुध्द तसेच महाराष्ट्र शासनाने दि. १८ ऑक्टोबर, १९९७ च्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या बिंदुनामावलीच्या विरोधात आहे..

७. दि. २० एप्रिल, २०२१ च्या शासन निर्णयानुसार दि. १८ फेब्रुवारी, २०२१ चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला होता परंतु आता दि. ०७ मे, २०२१ च्या शासन निर्णयाप्रमाणे पदोन्नतीची सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचे सूचित करुन मागावर्गीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गातून पदोन्नती मिळण्यासाठी दि. २५ मे, २००४ ची सेवाज्येष्ठता लक्षात घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे दि. २५ मे, २००४ नंतर आरक्षित बिंदुवर पदोन्नती झालेले कर्मचारी पदावनत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

८. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द महाराष्ट्र शासनाने विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर दि. १७ मे २०१८ व ५ जून २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने दि. १५ जून २०१८ च्या कार्यालयीन परिपत्रकानुसार आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्याबाबत सुचित करून कायद्यानुसार पदोन्नती देण्यासाठी प्रतिबंध नाही अशा सुचना देण्यात आल्या.

९. केंद्र शासनाच्या दि. १५ जून २०१८ च्या पत्रात स्पष्ट निर्देश दिले असतांना त्यावर महाधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई यांचे घेण्याची आवश्यकता काय? ही मा. सर्वोच्च न्यायालयाची अवमानता नाही. का?

१०. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. १५.०४.२०१९ च्या आदेशान्वये "स्टेट को" आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे अंतरीम आदेश दि. १७ २०१८ व ५ जून २०१८ कायम आहेत. तसेच केंद्र शासनाचे कार्मि प्रशिक्षण विभागाचे दि.१५ जून २०१८ चे पत्रातील निर्देश सुध कायम आहेत. त्याप्रमाणे आजही कार्यवाही करता येते.

११. उपरोक्त परित्रकानुसार राज्यातील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचा यांना सद्याच्या सेवाजेष्ठतेप्रमाणे खुल्या प्रवर्गातून पदोन्नती ल करणे शक्य आहे.

१२. Quantifiable data अजूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयात महारा शासनाने का सादर केला नाही?

१३. IA No.१०८९१५/२०१९ महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दि. १५.०४.२०१९ च्या आदेश Clarification करण्याकरीता अर्ज केला आहे. याची गरज का गरज नसतांना वेळकाढूपणा करण्याकरीता निरर्थक अर्ज मा. सर्व न्यायालयाला करणे म्हणजे मा. सर्वोच्च न्यायालयाची अवमा नाही काय?

१४. त्यामुळे दि. ७ मे २०२१ चा शासन निर्णय रद्द करून खालीलप्रम सुधारीत शासन निर्णय जारी करण्यात यावा. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्रम २७९७/२०१५ या प्रकरणी दि.०४.०८.२०१७ रोजी दिले निर्णयान्वये पदोन्नतीतील आरक्षण ठरविले असल्याने मा.स न्यायालयाने मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयास अद्याप स्थगिती नसल्याने पदोन्नतीच्या कोटयातील ३३% आरक्षित पदे रिक्त खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे सेवाजेष्ठतेने भरण्यात यावीत.

जे मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी दि. २५.०५.२० शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा घेऊन सेवाजेष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले आहेत, अधिकारी/ कर्मचारी त्यांच्या सद्यस्थितीतील सेवाजेष्ठतेनुसार प्रवर्गातून पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील."

> सद्य:स्थितीत पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय अस्तित्वात नाही आहे. कारण मा. उच्च न्यायालयाच्या दि.०४.०८.२०१७ च्या आदेशान्वये तो शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे.

> भारतीय राज्य घटनेच्या १६ (४अ) नुसार अनु. जाती / जमाती यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याची तरतुद विहीत आहे. मात्र अशी तरतूद करतांना त्या समाजघटकांचे पुरेसे प्रतिनिधीत्व तपासणे अत्यावश्यक आहे.

> याच कारणाने महाराष्ट्र शासनाचा दि. २५.५.२००४ चा शासन निर्णय मा. उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. अशाच प्रकारचे प्रकरण कर्नाटक राज्यामध्ये उद्भवले होते.

> कर्नाटक राज्याने अनु. जाती/जमातीचे प्रशासनातील पुरेसे प्रतिनिधीत्व नसल्यामुळे आरक्षणाची गरज प्रतिपादीत करुन २०१८ मध्ये या संदर्भात नवीन आरक्षण कायदा मंजूर केला व मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली आहे.

> महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत असे घडले नाही आपण केवळ सर्व मागासवर्गीयांची पदोन्नती थांबवून खुल्या प्रवर्गातील पदोन्नती (मागासवर्गीयांना वगळून) सुरु करुन उफराटा न्याय केला.

आता राज्य शासनाला दोन बाबींवर निर्णय घेणे आवश्यक आहे.

१. यासाठी सदर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य शासनाच्या वतीने बाजू मांडलेले सिनियर कौन्सिल अॅड. पटवालिया यांचे मत घेणे बाबत मागील एक वर्षापूर्वी श्री. कुंभकोणी महाधिवक्ता यांनी राज्य शासनाला सल्ला दिला होता. तथापि त्यावर राज्य शासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही आणि हा प्रश्न तसाच प्रलंबित ठेवण्यात आला.

२. त्यामुळे सिनियर कौन्सिल अॅड. पटवालिया यांचे मत घेणे आवश्यक आहे.

३ सर्वोच्च न्यायालयाने दि. १५.०४.२०१९ रोजी दिलेला " जैसे (Status-quo) खारीज करण्यासाठी प्रयत्न करणे.

४. अनु. जाती/जमाती चे २० टक्के आरक्षण तात्काळ लागू करण्यास पुरेसे प्रतिनिधीत्व (Quantifiable data) तपासून कर्नाटक धर्तीवर तात्काळ स्वतंत्र कायदा मंजूर करणे व पदोन्नती आरक्षण लागू करण्यासाठी कायदेशीर पावले उचलणे.

५. विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे बाब आरक्षण देणे बाबतचा निर्णय घेणे व सदरहू प्रवर्गाचे आरक्षण मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयात कसे टिकेल यासा प्रयत्न करणे.

- TV9Marathi

शुक्रवार, १४ मे, २०२१

"वैशाख पोर्णिमा" निमित्य स्वरचित राज्यस्तरीय काव्यगायन तथा काव्यवाचन व्हिडिओ निर्मिती स्पर्धा

 


ज्या कवी कवयित्रींनी स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/E7dUjcIF2JH5Yxw3EciMpd

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊    

     *स्पर्धा! स्पर्धा! स्पर्धा!! स्पर्धा!!!*

🥇🥈🥉🏅🎖️🏆🎖️🏅🥉🥈🥇

*अ.भा.म.सा.परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम*

📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️

*व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख :-*

             *27/05/2021

🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵

*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे (विदर्भ विभाग) आयोजित "वैशाख पोर्णिमा" निमित्य स्वरचित राज्यस्तरीय काव्यगायन तथा काव्यवाचन व्हिडिओ निर्मिती स्पर्धा*

🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬

*विषय:- १) तथागत भगवान बुद्ध*

            *२) माता रमाई*

🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌼🌼🌼    

       *संपूर्ण जगाला शांतीचा समतेचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती/ज्ञानप्राप्ती/महापरिनिर्वाण दिन तथा माता रमाई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्वरचित राज्यस्तरीय काव्यगायन तथा काव्यवाचन व्हिडिओ निर्मितीचे आयोजन करण्यात आले आहे.*      

        *सर्व साहित्यप्रेमी काव्यरसिक कवी/ कवीयित्री बंधू-भगिनींनी आपण स्वतः तयार केलेली स्वरचित कविता गायन तसेच कविता वाचनाचा व्हिडिओ तयार करावा. आणि तयार केलेला कवितेचा व्हिडिओ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या व्हाट्सअप ग्रुप वर किंवा 8329892984 या व्हाट्सअप क्रमांकावर दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत पाठवावा.*

         *या काव्य व्हिडिओ निर्मिती उपक्रमाचा हेतु असा की, काव्यात्मक व्हिडिओच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध तथा माता रमाई यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे व आपल्या प्रतिभावंत काव्यातुन अभिवादन करणे हाच आहे.*

          *तर चला काव्यप्रेमी काव्यरसिक साहित्यिकांनो, आपल्या प्रतिभेचा अविष्कार कवितागायन किंवा कवितावाचन व्हिडिओच्या माध्यमातून देश-विदेशातील सर्व मराठी काव्यप्रेमी, काव्यरसिक, साहित्यिक, कवी/कवियित्री बंधू-भगिनींपर्यंत पोचवावा. करिता सर्व कवी/कवियत्री यांना आव्हान करतो की, जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा....*

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

*स्पर्धेची नियमावली*

*१) स्पर्धेत स्वरचित एकच कवितेचा व्हिडिओ पाठवावा*

*२) व्हिडीओ तयार करताना सुरवातीला स्वतःचे पुर्ण नाव, पत्ता, शिर्षक अवश्य सांगण्यात यावा.*

*३) आपण पाठवलेल्या काव्य व्हिडिओचे समर्पक नाव/ शिर्षक असावे.*

*४) पाठवलेल्या कवितेच्या व्हिडीओ खाली आपले पूर्ण नाव, मो.क्र. व जिल्हा लिहावे.*

*५) कवितेच्या दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक असावे. संगीत वाद्यांचा वापर करून स्वतः संगीतबद्ध केलेला व्हिडिओ असेल तर प्राधान्य दिले जाईल.*

*६) कवितेत विषय येणे आवश्यक आहे, व्याकरण,यमक, शुद्ध उच्चार, गायण समर्पक असावे*

*७) काव्यस्पर्धा अ.भा.म.सा.प.नागपूर विभाग समूहातर्फे घेतली जाईल.*

*८) कविता कोणत्याही काव्यप्रकारात चालेल. काव्यप्रकाराचे बंधन नाही.*

*९) कवितेचा व्हिडिओ जास्तीत-जास्त ३ मिनिटाचा असावा. ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा व्हिडिओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.*

*१०) कवितेचा व्हिडिओ साईज ३० MB पेक्षा कमी असावा.*

*११) कवितेचा व्हिडिओ साईज ३० MB पेक्षा जास्त असल्यास कविता ग्राह्य धरले जाणार नाही.*

*१२) मोबाईल कॅमेरा मध्ये व्हिडिओ बनवताना व्हिडिओ साइज खूप जास्त MB चा तयार होतो. त्यामुळे अगोदर पूर्णपणे व्हिडिओ मोबाईल कॅमेराने बनवून घ्यावा. त्यानंतर व्हिडिओची साईज कमी करण्याकरिता video compressor ॲप डाऊनलोड करावे. ॲप ची लिंक खालील प्रमाणे आहे...* https://play.google.com/store/apps/details?id=com.idea.videocompress

*१३) व्हिडिओ तयार करताना तुमचा चेहरा पूर्णपणे दिसेल आणि आवाज सुस्पष्ट ऐकू येईल या पद्धतीने व्हिडीओ तयार करावा.*

*१४) वादग्रस्त कविता किंवा विद्रोही कविता पाठवू नये. समतेला प्रेरक कविता असावी,अश्लिल शब्दाचा वापर टाळावा.*

*१५) सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.*

*१६) परिक्षकांचा निकाल अंतिम राहिल. त्यात कोणीही हस्तक्षेेप करण्याचा व निकालास आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये.*

*१७) ठरवून दिलेल्या दिनांक व वेळेच्या नंतर आलेल्या रचना ग्राह्य धरल्या जाणार नाही.*

*१८) स्पर्धेमध्ये पाठवलेले स्वरचित कवितेचे व्हिडिओ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केले जाईल. जेणेकरून आपले व्हिडिओ आपल्या सर्वांना वारंवार केव्हाही बघता येईल आणि लाईक शेअर व कमेंट करणे शक्य होईल.*

*१९) कविता व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २७/०५/२०२१ ही राहील. यानंतर आलेल्या कवितागायण कथा कविता वाचन व्हिडिओचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.*

👤👤👤👤👤👤👤👤👤👤

🌐 *स्पर्धा नियंत्रक :-* 

 १) *मा. जयेंद्र चव्हाण सरचिटणीस अ. भा. म. सा. प. नागपूर विभाग*

२) *मा.निरज आत्राम जिल्हाध्यक्ष अ.भा.म. सा. प. चंद्रपुर नागपूर विभाग*

📒 *परीक्षक :-*

१) *श्री. मंगेश जनबंधु, विभागीय सचिव, अ.भा.म.सा.प. नागपूर विभाग*

२) *श्री. माणिकचंद रामटेके अ.भा.म.सा.प. जिल्हाध्यक्ष गडचिरोली, नागपूर विभाग*

३) *श्री. बच्चू गांवडे सरचिटणीस अ. भा. म. सा. प. अमरावती विभाग*

४) *मा. नरेंद्र गुळघाने सर जिल्हाध्यक्ष अ.भा.म. सा. प. वर्धा नागपूर विभाग*

५) *सौ. शितल सावदेकर कोषाध्यक्षा, महिला आघाडी विदर्भ प्रदेश, अ.भा. म.सा.प. पुणे*

६) *श्री. प्रकाश पिंपळकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रपूर, नागपूर विभाग*

६) *सौ. सोनाली सहारे रायपुरे ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष, नागपूर विभाग*

📒 *संकलन :-*

१) *सौ.संगिता बांबोळे महिला आघाडी विदर्भ प्रदेशध्यक्षा, अ.भा. म.सा.प. पुणे

२) *सौ.जयश्री सिरसाटे गोंदिया जिल्हा सचिव, नागपूर विभाग*

३) *मा.सौ. उषा शिलवंत घोडेस्वार उपाध्यक्षा, अ.भा. म. सा.प.भंडारा नागपूर विभाग*

४) *सौ. वर्षा राज इंगळे जिल्हाध्यक्ष बुलढाणा, अमरावती विभाग*

५) *श्री. संदीप शेंडे, विभागीय ग्राफिक्स संयोजक, नागपूर विभाग*

===========================

🖼️ *ग्राफिक्सकार:- श्री.संदीप शेंडे, विभागीय सदस्य अ.भा.म.सा‌.प नागपुर विभाग*

===========================

       👥 *मार्गदर्शक* 👥        

■ *मा. श्री. शरदजी गोरे साहेब* 

*राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अ. भा. म. सा. प. पुणे*

■ *मा. श्री. आनंदकुमार शेंडे सर*

*विदर्भ विभाग अध्यक्ष, अ.भा.म.सा.प. पुणे*

■ *मा. मिलिंद रंगारी सर*

*विदर्भ विभाग सरचिटणीस, अ.भा. म.सा.प. पुणे*

■ *मा.सौ.संगिता बांबोळे मॅडम*

*महिला आघाडी विदर्भ प्रदेशध्यक्षा, अ.भा. म.सा.प. पुणे*

■ *मा. श्री. सतीश सोमकुवर सर, नागपूर विभागीय अध्यक्ष, अ. भा. म. सा. प.पुणे*

■ *मा. विशाल वेरुळकर अमरावती विभागीय अध्यक्ष, अ.भा. म. सा. प. पुणे*

 ★ *विनित* ★

*■ *सर्व विदर्भ विभाग, नागपूर व अमरावती विभाग, जिल्हा,तालुका कार्यकारणी पदाधिकारी पदाधिकारी व सदस्य आणि अ.भा. म. सा. प.पुणे.*

       *सर्व काव्यरसिक, काव्यप्रेमी कवी/कवियत्री, यांना आव्हान करण्यात येते की, आपण काव्यस्पर्धेत सहभाग घेवून आपली मानवंदना अर्पित करावी ही नम्र विनंती.*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝      

 *👥 आयोजक 👥*

 *१) श्री.आनंदकुमार शेंडे*

      *विदर्भ विभाग अध्यक्ष*

  २) *श्री. संदीप शेंडे*

       *विभागीय ग्राफिक्स संयोजक*

       *अ.भा.म.सा.प. पुणे, नागपूर विभाग*

*टिप - कवितेचा व्हिडिओ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या व्हाट्सअप ग्रुप वर किंवा 8329892984 या व्हाट्सअप क्रमांकावर दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत पाठवावा.*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बुधवार, १२ मे, २०२१

Online Olympiads registration and schedule


Online Olympiads registration and schedule :-

Online resources are easy to handle, manage and share, apart from which ease of accessibility and simple availability adds to the pros , time and time proving to be of great help. The prevailing global situation has had the people stay at home away from physical resources and adapting to the a virtual way of life in terms of profession as well as education. With the rapid increase in this unforeseen digitalization, virtual media has benefitted all.

Indian Talent Olympiad works with an aim to provide only the very best of educational services to today’s generation. ITO has an experience of organizing Olympiads across the nation for eight-plus years ,on both online and offline media, the organization has a firm grasp on the process involved and is hence distributing resources in the smoothest and most versatile of ways..

Online Olympiads have recently gained much momentum due to digitalization. Olympiads are useful to kids who branch out and explore their interests and skills, those that want quite a grasp on their interest and want to grow.

The Olympiads are very easy to avail and quite beneficial to one. One can simply visit the website to find more information regarding the same. A few quick facts to know about the Olympiads are as follows:

•The Olympiads are held for eight subjects, in which a student can opt for one or more options.

📒 Olympiad Eligibility :-

International Science Olympiad (ISO) Students of class 1-10

International Maths Olympiad (IMO) Students of class 1-10

English International Olympiad (EIO) Students of class 1-10

General Knowledge International Olympiad (GKIO) Students of class 1-10

International Computer Olympiad (ICO) Students of class 1-10

International Drawing Olympiad (IDO) Students of class 1-10

National Essay Olympiad (NESO) Students of class 1-10

National Social Studies Olympiad (NSSO) Students of class 1-10

📒 REGISTRATION FEE :-

The registration fee for the tests are as low as Rs 150, the last dates for registrations are:

🌐 LAST DATE OF REGISTRATION FROM SCHOOL - 30th September 2021

🌐 LAST DATE OF REGISTRATION BY INDIVIDUAL STUDENTS - 15th November 2021

🌐 ONLINE REGISTRATION LINK :-

https://www.indiantalent.org/

• The registration can be done contacting the concerned subject teacher or by an individual by visiting the official site directly.

• The exams are sometimes held in two tiers, both in online as well as offline means..

• The exams are held on a monthly as well as an annual basis so that students can opt for it based upon their convenience.

• Several structured workbooks are curated chapter chapter-wise and edited regularly to provide the best for the students, previous year question papers are available for the students to practice from, apart from the mock tests and model papers. The chosen resources provide students with exposure so that they gain confidence in dealing with unknown questions of the kind.

• The exam papers and resources are accessible on all digital devices as mobiles, laptops and tablets.

• The question paper is based on an MCQ type pattern to help students familiarize themselves with it, the set aims to create an exam environment and helps students to get acquainted with performing even under similar condition. The elaborate distribution can be found on the official website. It is much like a practice for future competitive exams.

• The results can be easily seen at the portal upon entering the roll no, between provided dates, associated details and awards would be mentioned on the official page of Indian Talent Olympiad itself.

• To further acknowledge the hard work of the students, the individuals are awarded based upon their merit. The details of which can be found on the official website itself.

• A winners gallery is maintained to keep a record of these exceptional and budding individuals who stand out thanks to their dedicated efforts and perseverance. This gallery serves to acknowledge the students and boost their morale besides inspiring the upcoming batch of bright individuals with their skills dedication and love for their subject.

The efforts of the Indian Talent Olympiad have been praised by many. Ms P.T. Usha, the renowned Indian Olympic athlete, a Padmashree awardee, and the head of the Indian Talent Olympiad advisory committee can be seen expressing her congratulatory remarks on the official website.

33,175+ schools and Millions of students across India have registered and participated in the Olympiad exams conducted by the Indian Talent Olympiad till date. Thousands of students have been awarded prizes every year, this year too we look forward to awarding many such bright individuals. The Olympiads registrations are now open. One can take this opportunity to evaluate their understanding of subjects and stand an opportunity to win exciting prizes.

Many greetings and best wishes.

One can contact at : 1800 266 9192 ,

or

Queries can also be mailed at: info@indiantalent.org, for further support.

- Nagpur Today

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी १५ मे पर्यंत अटी व शर्ती न स्वीकारलेल्यांची खाती काढून टाकली जाणार नाहीत.....


हॉट्सअ‍ॅपच्या अटी १५ मेपर्यंत मान्य नाही केल्या, तरी खाती कायम.....

व्हॉट्सअ‍ॅप या संदेश उपयोजनाने वापरकर्त्यांना नव्या अटी व शर्ती स्वीकारण्यास १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली होती, पण ती रद्द करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जे लोक या मुदतीत अटी व शर्ती स्वीकारणार नाहीत त्यांची खाती काढून टाकली जाणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

नवीन अटी व शर्ती स्वीकारण्याच्या धोरणावरून व्हॉट्सअ‍ॅपवर बरीच टिका झाली होती. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अटी व शर्ती या व्यक्तिगततेचे उल्लंघन करणाऱ्या आहेत अशी तक्रार केली जात होती.

व्हॉट्सअ‍ॅपने इमेल संदेशात म्हटले आहे की, १५ मेपर्यंत  जरी कुणी अटी व शर्ती स्वीकारलेल्या नाहीत, तरी त्यांची खाती काढून टाकली जाणार नाहीत. भारतातील कुणाचेही व्हॉट्सअ‍ॅप वापरणे बंद करण्यात येणार नाही. पुढील अनेक आठवडे अटी व शर्ती स्वीकारण्यासाठी वापरकर्त्यांना संदेश येत राहतील. प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे की, अनेक वापरकर्त्यांनी नव्या अटी व शर्ती स्वीकारल्या आहेत. काही लोकांना तशी संधी मिळालेली नाही. असे असले तरी या निर्णयमागचे कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही. किती वापरकर्त्यांनी अटी व शर्ती स्वीकारल्या आहेत हे सांगण्यात आलेले नाही.

यावर्षी जानेवारी महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने अपडेट देण्यास सुरुवात केली होती. वापरकर्त्यां नवीन व्यक्तिगतता धोरण स्वीकारण्यास सांगितले होते. सुरुवातीला कंपनीने अटी व शर्ती स्वीकारण्यास ८ फेब्रुवारी २०२१ ही मुदत दिली होती. नंतर ती १५ मे करण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती फेसबुक व इतर संलग्न कंपन्यांशी वाटून घेतली जाईल पण ते केवळ व्यावसायिक खात्यांसाठीच असेल असे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले होते. व्हॉट्सअ‍ॅपने असे म्हटले होते की, माहितीच्या गुप्ततेत कुठलाही बदल करण्यात येणार नाही. खासगी संदेश कुठेही जाहीर होणार नाही तसेच वापरकर्त्यांची इतर माहिती फेसबुकला दिली जाणार नाही पण तरीही या धोरणाबाबत संदिग्धता कायम राहिली. जेव्हा एखादी व्यक्ती व्यावसायिक गटांशी संपर्क साधतील तेव्हा ती माहिती विपणनासाठी फेसबुक वापरू शकेल असे सांगण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपने नव्या अटी व शर्ती लागू केल्यानंतर अनेकांनी टेलीग्राम व सिग्नल या उपयोजनांना प्राधान्य दिले होते. या उपयोजनांची लोकप्रियता या काळात वाढली. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रकरणात एक दावा दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. अलीकडच्या एका सुनावणीत सरकारने सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण हे २०११ मधील माहिती तंत्रज्ञान नियमांचे भंग करणारे असून कंपनीला हे धोरण राबवण्यापासून परावृत्त करावे. व्हॉट्सअ‍ॅपने आपली धोरणे राबवण्याची योजना सोडून दिल्यासारखेच आहे असे बोलले जाते.

- लोकसत्ता

मंगळवार, ११ मे, २०२१

Covid-19 मुळे होणा-या कर्मचाऱ्यांच्या ( १८ वर्षा वरील) पाल्यांना सरकारी सेवेमध्ये घेण्याचा शासननिर्णय......

भारत सरकारच्या परिपत्रकानुसार सरकारी, निम सरकारी, बँक, एलआयसी, ऑईल कंपनी इत्यादी सेवेतील ज्यांच्या मृत्यू Covid-19 मुळे झाला त्यांच्या पाल्यांना ( १८ वर्षा वरील) सरकारी सेवेमध्ये घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे....



कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा मोठय़ा प्रमाणात फैलाव


म्युकरमायकोसिसचा मोठय़ा प्रमाणात फैलाव मागणी वाढल्याने औषधांचा तुटवडा भासण्याची भीती

करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. या आजारावरील औषधे महागडी असून, मागणी वाढल्याने औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पहिल्या लाटेत करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे आढळले होते. यात काही रुग्णांना दृष्टीही गमवावी लागली. दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे केवळ सरकारीच नव्हे तर खासगी कान, नाक, घसातज्ज्ञांकडे या रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ‘‘पहिल्या लाटेनंतर दोन महिन्यांतून एखाद्या रुग्णाला याची बाधा झाल्याचे पाहायला मिळत होते; परंतु आता तीन ते चार दिवसांतून एक रुग्ण येत आहे. संपूर्ण राज्यात या आजाराचे प्रमाण वाढले आहे,’’ असे कान- नाक- घसातज्ज्ञ डॉ. सोनाली पंडित यांनी सांगितले. केईएममध्ये याची बाधा झालेल्यांची रुग्णसंख्या गेल्या लाटेच्या तुलनेत दुपटीने वाढल्याचे कान- नाक- घसा विभागाचे प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले. मुंबईत उपनगरीय रुग्णालयांमध्येही हे रुग्ण मोठय़ा प्रमाणात येत असून तेथील अनेक रुग्ण उपचारांसाठी पाठविले जात असल्याचे कूपर रुग्णालयातील कान- नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी सांगितले.

📒स्टिरॉइड्सच्या अतिरेकी वापराचे परिणाम..

‘पहिल्या लाटेच्या वेळी स्टिरॉइडचा वापर उशिरा सुरू झाला. त्यामुळे याचा वापर तुलनेने अधिक काळजीपूर्वक केला गेला; परंतु दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांच्या उपचारामध्ये स्टिरॉइडचा अतिरेक आणि गैरवापर केल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती ही बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने इतर औषधांच्या वापराचा अतिरेकही यास कारणीभूत आहे का याचा अभ्यास करणे गरजेचे आहे,’ असे मत कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी व्यक्त केले.

📒 म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.

📒 रुग्णाची अवस्था दयनीय...

पालिका आणि सरकारी रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा कमी आहे. त्यामुळे याला पर्यायी औषधांचा वापर केला जातो. परंतु, या पर्यायी औषधांचे दुष्परिणामही अधिक आहेत. काहीवेळा औषधे नातेवाईकांना आणायला सांगतो, अशी माहिती पालिकेच्या डॉक्टरांनी दिली. पहिल्या पाच ते सात दिवसांसाठीच साठ हजारांहून अधिक खर्च असल्याने आम्ही हा खर्च कसा करायचा असा प्रश्न रुग्णांकडून उपस्थित केला जात आहे.

 📒 ‘एमआरआय’द्वारे योग्य निदान...

ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरली जाते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीमध्ये होत नाही. ते एमआरआयमध्येच योग्यरितीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे. सध्या चाचण्या केंद्रांवर सिटीस्कॅनसाठीच एवढी गर्दी असते की एमआरआयसाठी वेळ देण्यास केंद्र तयार होत नाहीत. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल, असे मत डॉ. भूमकर यांनी व्यक्त केले.

📒 आजाराची तीव्रता अधिक....

म्युकरमायकोसिस आजार कर्करोगापेक्षाही झपाटय़ाने वाढतो. याची लक्षणे सर्वसामान्य असल्याने याचे निदानही लवकर होत नाही. त्यामुळे आमच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबईबाहेरील असून निदान होऊन रुग्णालयात येईपर्यत यांच्यातील आजाराची तीव्रता खूप वाढलेली असते. गेल्या वर्षी मेंदूपर्यत हा आजार गेल्याचे फारसे आढळत नव्हते. परंतु सध्या आमच्याकडे १० रुग्णांच्या मेंदूपर्यत ही बुरशी पोहोचली आहे. पाच रुग्णांचा डोळा काढावा लागला आहे. त्यामुळे निदान वेळेत करणे आवश्यक आहे, असे डॉ. हेतल यांनी सांगितले. या आजाराच्या उपचारासाठी आता जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक असे अन्य जिल्ह्यातूनही रुग्ण मुंबईत येत आहेत.

📒 प्रतिबंधात्मक उपायांवर भर.....

करोना झाल्यानंतर स्टिरॉईड खूप प्रमाणात घेतलेले, अतिदक्षता विभागात उपचार घेतलेले, कृत्रिम श्वसनयंत्रणेवर बराच काळ असलेले आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक आहे. आजारातून बरे झाल्यानंतर दर आठवडय़ाला नाकाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्यास वेळेत निदान होऊ शकेल. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही तपासणी करणे आवश्यक आहे. या आजाराबाबत समाजमाध्यमातून भीती निर्माण करणाऱ्या संदेश पसरविले जात असून घाबरून जाऊ नये, असे डॉ. सोनाली पंडित यांनी सांगितले.

📒 लक्षणे....

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे

📒औषधांचा खर्च सुमारे १५ ते २० लाख...

करोनाच्या आधी हा आजार वर्षांतून तीन ते चार रुग्णांमध्ये आढळून येत होता. त्यामुळे औषधांची मागणीही तुलनेने कमी होती; परंतु आता रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने औषधांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे पुढील काही आठवडय़ांत याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मुळातच ही औषधे खूप महाग आहेत. रुग्णाला ही औषधे जवळपास तीन ते सहा आठवडय़ांपर्यंत घ्यावी लागतात. त्यामुळे एका रुग्णाला जवळपास १५ ते २० लाखांपर्यंतच खर्च येतो, अशी माहिती कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी दिली.

- लोकसत्ता

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

१८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी Covid-19 ऑनलाइन लसीकरण नोंदणीला सुरुवात......

💉 Covid- 19 लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

📒 भारत सरकारच्या निर्देशानुसार 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी Covid-19 लसीकरण मोहीम 1 मे 2021 पासून सुरू होत आहे, त्यासाठी दिनांक 28 एप्रिल 2021 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरिता सुरुवात झालेली आहे. तरी सर्व नागरिकांनी लस टोचून घ्यावी म्हणजेच लसवंत व्हावे आणि स्वतःला सुरक्षित करावे ही विनंती.....

🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

🌐 लसीकरण नोंदणी करण्यासाठीची लिंक :-

https://selfregistration.cowin.gov.in/

👆🏻 या लिंक वर क्लीक करा.

🌐 Covid - 19 लसीकरणासंबंधी ऑनलाइन प्रक्रिया :-

📲 मोबाईल नंबर रजिस्टर करा व त्यावर आलेला OTP नोंदवा.

📲 आपला आधार क्रमांक नोंदवा.*

📲 Gender सिलेक्ट करा.*

📲 जन्म वर्ष टाका.

📲 वरील सर्व माहिती रजिस्टर करा.

📲 पिन कोड टाका व त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करा.

📲 आपणांस 2 मेसेजेस येतील त्यातील..

📲 पहिला मेसेज रेफरन्स ld लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे. 

📲 दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे याचा आहे.

⛑️⛑️⛑️🌡️🌡️🌡️💉💉💉💊💊💊⛑️⛑️⛑️

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

🏣 महाराष्ट्र डाक विभाग मध्ये 10 वी च्या गुणांवर 2400 + पदांसाठी मेगाभरती....



🏣 महाराष्ट्र डाक विभाग मध्ये 10 वी च्या गुणांवर 2400 + पदांसाठी मेगाभरती....

👷 महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक 2428 पोस्ट....

✅ ऑनलाईन अर्ज सुरवात :- 27 एप्रिल 2021. 

✅ Last Date :- 26 मे 2021. 

✅ Age - 18 ते 40

✅ प्रत्येक 5 option साठी 100 रुपये फीस आहे. महिलांना फीस नाही.

✅ फक्त 10 वीच्या गुणांवर निवड. ज्यांना 10 वीला चांगले मार्क्स असतील ते भरू शकतात.

✅ एकूण 20 option देऊ शकता.

🌐 वेबसाईट लिंक :-

https://appost.in/gdsonline/home.aspx 


📒 कोठे जागा आहेत याची संपूर्ण माहिती pdf मध्ये आहे.


मंगळवार, ९ मार्च, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व ८ वी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरुवात

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी दि. 25 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दि. 9 मार्च ते 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा करोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल महिन्यात दि. 25 एप्रिल 2021 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

✍️आवश्यक सूचना : शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता विद्यार्थ्यांची बँक खाते क्रमांक व आधारकार्ड अनिवार्य नाही.

🌐 महत्वाच्या लिंक :

१) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे लिंक :

http://www.mscepune.in/

२) स्कॉलरशिप इयत्ता पाचवी व आठवी करिता पोर्टल :

https://www.mscepuppss.in/

३) शाळा रजिस्ट्रेशन व शाळा माहिती प्रपत्र :-

https://www.mscepuppss.in/School_registration.aspx

४) शाळा लॉगीन :-

https://www.mscepuppss.in/LoginPage.aspx


📝 आवेदन पत्र भरणेबाबतच्या सूचना लिंक : 

१) शाळा माहिती प्रपत्र

२) इयत्ता ५ वी आवेदन पत्र

३) इयत्ता ८ वी आवेदन पत्र


📝 इयत्ता ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा- 2021 माहिती :

१) अधिसूचना

२) वेळापत्रक

३) अभ्यासक्रम

बुधवार, ३ मार्च, २०२१

IGNOU B.ed - 2021 प्रवेश पात्रता परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात....

📝 IGNOU B.ed प्रवेश पात्रता परीक्षा - 2021

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली (IGNOU) बीएड प्रोग्राम हा हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये २ वर्षाचा अभ्यासक्रम आहे. ११ एप्रिल २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कमीतकमी 50% एकूण गुणांसह कोणत्याही शाखेत पदवीधर उमेदवार बीएड परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. इग्नू बीएड २०२१ ऑनलाईन अर्ज फॉर्म ऑनलाईन पद्धतीने २ मार्च, २०२१ पासून भरण्यास सुरुवात झालेली आहे.

🌐 इग्नू बीएड परीक्षा 2021 साठी अर्ज करा.....

https://sedservices.ignou.ac.in/entrancebed/

⭕ इग्नू बीएड २०२१ प्रवेश परीक्षा देशभरातील इग्नूच्या विविध पीएससी (प्रोग्राम स्टडी सेंटर) येथे देण्यात येणा-या २ वर्षाच्या बीएड प्रोग्रामच्या प्रवेशासाठी दोन सत्रांत घेतली जाते.

⭕ सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. एकाधिक निवड प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील, त्यातील एक योग्य पर्याय असेल.

⭕ पेपरला 2 आणि ए आणि बी विभागले जाईल आणि प्रयत्न करण्यासाठी एकूण वेळ 2 तास दिला जाईल.

🌐 इग्नू बीएड प्रॅक्टिस पेपर्स डाऊनलोड करा...

https://webservices.ignou.ac.in/Pre-Question/Entrance%20Test%20Paper/entrance/Entrance%20Examination.htm

📝 इग्नू बीएड 2021 हायलाइट :

🔆 परीक्षेची तारीख : 11 एप्रिल 2021

🔆 एकूण जागा : 50 प्रति पीएससी

🔆 परीक्षेची पद्धत : ऑनलाइन मोड

🔆 परीक्षेचे माध्यम : इंग्रजी आणि हिंदी

🔆 परीक्षेचा कालावधी :  2 तास

🔆 प्रश्नांचा प्रकार आणि संख्या : 100 एमसीक्यू

🔆प्रश्नपत्रिकेत विभागांची संख्या : २ (भाग अ आणि ब)

📝  इग्नू बीएड प्रवेश 2021 परीक्षा कार्यक्रम तारखा :

✳️ इग्नू बीएड 2021 नोंदणीची सुरूवात : मार्च 2, 2021 (खुला)

✳️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2021

✳️ इग्नू बीएड प्रवेश पत्र जारी करण्याची तारीख : परीक्षेच्या 10 दिवस आधी

✳️ इग्नू बीएड 2021 परीक्षेची तारीख : 11 एप्रिल 2021

📒 इग्नू बीएड प्रवेश 2021 : पात्रता

🔅उमेदवारांनी बीएड प्रवेशासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या आवश्यक पात्रतेच्या निकषांची पूर्तता केली तरच इग्नू अर्ज फॉर्म स्वीकारेल. इच्छुक खाली इग्नू बी.एड प्रवेशासाठी पात्रतेच्या निकषांची तपशीलवार तपासणी करू शकतात.

🔅पदव्युत्तर पदवी किंवा / किंवा विज्ञान / सामाजिक विज्ञान / वाणिज्य / मानवता विषयातील पदव्युत्तर पदवी मध्ये किमान 50% गुण आहेत.

🔅विज्ञान आणि गणित विषयातील 55% गुणांसह किंवा इतर कोणत्याही पात्रतेच्या पदवीसह अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवीधर

🔅प्राथमिक शिक्षणात सेवेतील शिक्षक प्रशिक्षित.

🔅किमान पात्रता पात्र गुणांपैकी ४५% सवलत अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी (न-मलईयुक्त स्तर) / पीडब्ल्यूडी उमेदवारांना भारत सरकारच्या निकषांनुसार पुरविली जाईल.

🔅विद्यापीठाच्या नियमांनुसार काश्मिरी स्थलांतरितांनी आणि युद्ध विधवा उमेदवारांना आरक्षण दिले जाईल.

🔅इग्नूमधील शैक्षणिक अभ्यासाच्या उद्देशाने प्रथम पदवीशिवाय पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी स्वीकारली जात नाही.

✍️टीपः इग्नू बीएड सीईटी 2021 वर येण्यासाठी वयाची कोणतीही बार नाही. कोणत्याही वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.

📒 इग्नू बीएड प्रवेश 2021 अर्ज :-

इग्नू बीएड २०२१ चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येतो व सादर करता येतो. इग्नू बीएड प्रवेश 2021 अर्ज भरण्यासाठीच्या steps या खाली नमूद केल्या आहेत.

१. IGNOU च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://sedservices.ignou.ac.in/entrancebed/ 

२. बीएड अर्ज फॉर्म लिंकवर क्लिक करा.

३. वेबसाइटवर नोंदणी करा 

४. सिस्टम व्युत्पन्न केलेला अनुप्रयोग क्रमांक नोंदवा.

५. ऑनलाईन अर्ज भरा.

६. आवश्यक कागदपत्रे आणि छायाचित्रे अपलोड करा.

७. प्रदान केलेल्या जागेत स्कॅन केलेली स्वाक्षरी ठेवा.

८. वेबसाइटवर क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग पद्धतींद्वारे अर्ज भरा आणि फी भरा.

९. पुष्टीकरण पृष्ठ दिसून येईल, भविष्यातील संदर्भासाठी तेच डाउनलोड करा. 

📒 इग्नू बीएड प्रवेश 2021 अर्ज शुल्क :

इग्नू बीएड नोंदणी शुल्क सुमारे 600.00 इंडियन असेल. उमेदवारांनी नोंदणीच्या वेळी फी जमा करणे आवश्यक आहे. जर कोणताही उमेदवार फी भरण्यास चुकला असेल तर अर्ज अपूर्ण मानला जाईल आणि तो नाकारला जाईल. शुल्क कोणत्याही एका ऑनलाइन पद्धतीने (क्रेडिट / डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग मार्गे) सबमिट केले जाऊ शकते. एकदा सादर केलेली नोंदणी फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. 

📒 इग्नू बीएड प्रवेश 2021 प्रवेश पत्र :

इग्नू बीएड 2021 प्रवेश पत्र एप्रिल 2021 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाईल. परीक्षा केंद्राशी संबंधित तपशील, तारीख व शिफ्ट (टायमिंग) प्रवेश पत्रात नमूद केले जातील. वेबसाइटवरून उमेदवारांना प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यात अक्षम असल्यास, त्यांनी सकाळी १०:०० ते संध्याकाळी :00:०० दरम्यान हेल्प लाईनशी संपर्क साधावा. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवार अचूकतेची खात्री करण्यासाठी सर्व तपशील तपासून पहा. प्रवेश पत्रात काही विसंगती आढळल्यास ती त्वरित इग्नूच्या निदर्शनास आणली जाईल. दुरुस्तीसाठी उमेदवारांनी हेल्पलाईनशी संपर्क साधावा. 

📒 प्रवेश पत्र / हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी :- 

1. IGNOU च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. बीएड प्रवेश परीक्षा २०२१ च्या हॉल तिकिटाच्या लिंकवर क्लिक करा.

3. एक विंडो (खाली दर्शविल्याप्रमाणे) स्क्रीनवर दिसून येईल.

4. आता दिलेल्यापैकी कोणत्याही पद्धतींचे अनुसरण करा:

📒 पद्धत 1 :-

1. अर्ज भरल्याप्रमाणे नाव द्या. 

2. स्क्रीनवर दिसणार्‍या निकालामधून नाव आणि नावनोंदणी क्रमांक शोधा.

3. नावनोंदणी क्रमांकावर क्लिक करा आणि प्रवेश पत्र प्रिंट करा.

4. अ‍ॅडमिट कार्डवर अ‍ॅफिक्स छायाचित्र.

5. राजपत्रित अधिका-यांकडून छायाचित्र साक्षांकित करा.

प्रवेशाच्या दिवशी परीक्षेच्या दिवशी प्रवेश पत्र घेऊन जा.

📒 पद्धत 2 :- 

1. 9 अंकी नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.

2. प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसून येईल.

3. प्रवेश पत्र जतन आणि मुद्रित करा.

4. अ‍ॅडमिट कार्डवर अ‍ॅफिक्स छायाचित्र.

5. राजपत्रित अधिका-यांकडून छायाचित्र साक्षांकित करा.

⭕प्रवेशाच्या दिवशी परीक्षेच्या दिवशी प्रवेश पत्र घेऊन जा.

⭕उमेदवारांनी त्यांची प्रवेश पत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे, जसे की वैध फोटो-आयडी पुरावा परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राकडे नेणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र केवळ यशस्वीपणे नोंदणीकृत अर्जदारांना दिले जाईल.

⭕Card कार्डच्या मागील बाजूस छापलेल्या सूचना उमेदवारांनी नख पूर्ण केल्या पाहिजेत. कृपया नोंद घ्या की अ‍ॅडमिट कार्डवर चिकटवलेले छायाचित्र राजपत्रित अधिका-याने अचूकपणे केले पाहिजे.

📒 इग्नू बीएड 2021 प्रवेश परीक्षा नमुना:-

1.इग्नू बीएड 2021 प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन आधारित परीक्षा असेल. 

2.प्रश्न एकाधिक निवड प्रश्नांच्या स्वरूपात विचारले जातील. कागदाचा कालावधी 2 तासांचा असेल.

3.प्रत्येक प्रश्नात 1 गुण असेल आणि परीक्षेत नकारात्मक चिन्हांकित करण्याची तरतूद नाही . 

4.पेपरचे 2 आणि दोन विभाग केले जातील- अ आणि बी.

📒 भाग -ए... भाग-बी

      सामान्य इंग्रजी आकलन

📒 विषयांची क्षमता (कोणतीही एक)

विज्ञान

गणित

सामाजिक विज्ञान

इंग्रजी

हिंदी

तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्क

📒 विषय पात्रता : 

एनसीईआरटी / सीबीएसईने ठरविलेल्या नववी / दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

✍️ टीप :  उमेदवारांनी कोणत्याही एका विषयाची उत्तरे फक्त भाग-ब मध्ये दिली पाहिजेत.

🌐 IGNOU b.ed -2021 परीक्षेचे प्रॉस्पेक्टस डाऊनलोड करा.



रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याकरिता विशेष शोध मोहीम राबवण्याबाबत.....


📝शासन निर्णय :- शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याकरिता विशेष शोध मोहीम राबवण्याबाबत.....

शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याकरिता विशेष शोध मोहीम राबवण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 23 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहे.

राज्यात शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम १ मार्च ते १० मार्च २०२१ दरम्यान राबवण्यात येत आहे.राज्याच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात राज्याच्या महसूल, ग्रामविकास, नगर विकास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मीक बालविकास योजना,कामगार,अल्पसंख्यांक,आदिवासी विकास, महिला व बालविकास व आरोग्य विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

🌐 शासन निर्णय खालील प्रमाणे डाऊनलोड करण्यासाठी लिंक वर टच करा...


🌐 बालकांची शोधमोहीम करिता लागणारे सर्वेक्षण प्रपत्र अ,ब,क,ड  साॅफ्ट काॅपी फॉरमॅटमध्ये देण्यात आलेले आहे ती खालील प्रमाणे डाऊनलोड करू शकता.....






बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

इयत्ता ९ वी - १० वी आणि ११ वी - १२ वी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना


📒  इयत्ता ९ वी - १० वी आणि ११ वी - १२ वी सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजना परिपत्रक.....

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांच्या दिनांक १०/२/२०२१ च्या परीपत्रकान्वये जलसुरक्षा, कार्यशिक्षण, समाजसेवा व व्होकेशनल, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुधारित विषयी योजना आणि मूल्यमापन योजना सन २०२०-२१ पासून लागू करण्यात आलेली आहे. 

शैक्षणिक सत्र 2020-21 पासून इयता 9 वि तर 2021-22 पासून इयता 10 वि साठी "जल सुरक्षा" हा विषय "स्वविकास व कला रसास्वाद" या श्रेणी विषयाऐवजी अनिवार्य विषय म्हणून समावेश करण्यात आला आहे.

कला इतिहास, रसग्रहण आणि भारतीय संगीत इतिहास व विकास यासंबंधी पाठ्यपुस्तक निर्मितीची अंमलबजावणी इयत्ता ९ वी साठी सन २०२०-२१ पासून तर येता १० वी साठी सन 2021- 22 पासून करण्यात आली आहे.

🌐मा. संचालक, SCERT पुणे यांचे सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजना परिपत्रक खालील प्रमाणे आहे.




गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत....

गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत....

शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही  विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक गोष्ट घडून आली आहे. धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे.

अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे. शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहे. ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल’ या नावाने धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील २४४ (१), ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये ही शाळा सुरू करण्यात आली. या शाळेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी व गोंडी समाज सेवक गणेश हलामी, देवसाय पाटील आतला उपस्थित होते.



स्रोत - लोकसत्ता

"Mentoring To Schools By Higher Educational Institution" वेबिनार शृंखला.....


राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी ऑनलाइन "Mentoring To Schools By Higher Educational Institution" वेबिनार शृंखला.....

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व प्रादेशिक विद्या प्राधिकरण ( राज्य विज्ञान शिक्षण संस्था ) नागपूर द्वारे राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत कार्यक्रम वेबिनार शृंखला दिनांक 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांकरिता "Mentoring To Schools By Higher Educational Institution" आयोजित करण्यात आली आहे.

📝 दिवस - पहिला

🏣Mentoring Institute : Tata Institute of Fundamental Research, (TIFR) Mumbai

⭕ प्रमुख वक्ते : डॉ. नरेंद्र देशमुख, श्री विनोद सोनवाने, श्री. करुण हंबीर, श्री. प्रणव खोत

📒 Topic : Yes , You Can Do It !

⏰ दिनांक व वेळ :- 

24 फेब्रुवारी 2021, दुपारी 3:00 ते 4:30 PM

🌐 You tube link :- 

https://youtu.be/SM3-3Qmmq3w


📝 दिवस - दुसरा :-

🏣Mentoring Institute - Indian Institute of Science Education and Research, (IISER), Pune.

⭕ प्रमुख वक्ते - श्री. अशोक रुपनेर

📒 Topic - Fun with Science

⏰ दिनांक व वेळ - 

25 फेब्रुवारी 2021 दुपारी 3:00 ते 4:30 PM

🌐 You tube link :

https://youtu.be/obR5gFLaDCU


📝 दिवस - तिसरा :-

🏣Mentoring Institute - National Environmental Engineering and Research Institute, (NEERI), Nagpur

⭕ प्रमुख वक्ते - डॉ. गजानन खडसे

📒Topic- Water and soil Environment

दिनांक व वेळ :- 

26 फेब्रुवारी 2021 दुपारी 3:00 ते 4:30 PM

🌐 You tube link -

https://youtu.be/RXvYgvTqqJ8


📝 दिवस - चौथा :-

🏣 Mentoring Institute - Inter University Centre for Astrology and Astrophysics, (IUCAA), Pune

⭕ प्रमुख वक्ते :- डॉ. सोनल थोरवे

📒 Topic - कृतीतून खगोलशास्त्र आणि करिअरच्या वाटा

दिनांक व वेळ :-

 27 फेब्रुवारी 2021 दुपारी 3:00 ते 4:30 PM

🌐 You tube link - 

https://youtu.be/IXWTj3WtN1Y


📝 दिवस - पाचवा :-

🏣 Mentoring Institute- Indian Meteorological Department (IMD), pune

⭕ प्रमुख वक्ते - डॉ. शिरीष खेडीकर

📒Topic- Transforming innovative ideas into reality

दिनांक व वेळ :- 

28 फेब्रुवारी 2021 दुपारी 3:00 ते 4:30 PM

🌐 You tube link - 

https://youtu.be/l2o_HJaOVGI


🌐 Webinar Link Smart pdf :-



सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

आदिवासी उपयोजना उपस्थितीभत्ता स्थगितीबाबत.....

📒 आदिवासी उपयोजना २०२० -२१ अंतर्गत उपस्थिती भत्ता स्थगितीबाबत.....

माननीय संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत शाळा बंद असून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. करिता इयत्ता पहिली ते चौथी मधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्र व्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसूचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो. परंतु यावर्षी सन 2020 21 मध्ये covid-19 चा प्रादुर्भाव शाळा बंद असल्याने सदर योजनेचा लाभ देण्यात येऊ नये असे माननीय शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित केलेले आहे.

🌐माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेले परिपत्रक खालील प्रमाणे आहे.




PDF file download Link :- 




रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

UPSC परिक्षा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम-२०२१

✍️ सामायिक प्रवेश परीक्षा - 2021

UPSC नागरी सेवा परीक्षा - 2021च्या पूर्वतयारीसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम - 2021

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2021 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता राज्य प्रशासकीय व्यवसायिक शिक्षण संस्था मुंबई सह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर केंद्रातील प्रशिक्षण प्रवेशास सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याकरिता इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

🌐 ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट  - www.siac.org.in

🌐 ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता रजिस्ट्रेशन 

- https://register.siacexam.org/

🌐 ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात - ०८/०२/२०२१

🌐 ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक - ०७/०३/२०२१

🌐 अभिरूप चाचणी (Mock Test) - २८/०३/२०२१

🌐 सामायिक प्रवेश परीक्षा निकाल - २८/०३/२०२१

📝 जाहिरात -

UPSC सामायिक प्रवेश परीक्षा- 2021 राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई (SIAC).



शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत

शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय.....

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राज्य शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर निर्बंध घालणारे २९ डिसेंबर २०१७ चे परिपत्रकही रद्द करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या २००४ च्या आरक्षण कायद्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर आरक्षण लागू करणारी तरतूद मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट २०१७ रोजी रद्द केली. राज्य सरकारने त्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल केली असून ती सध्या प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अद्याप स्थगिती दिली नसल्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबलेली आहे. त्यातच राज्य शासनाने २९ डिसेंबर २०१७ रोजी एक परिपत्रक काढून मागसर्गीयांच्या पदोन्नतीवर निर्बंध घातले. मागासवर्गीयांची रिक्त पदे ठेवून केवळ खुल्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड आदी मंत्र्यांनी मागावर्गीयांच्या पदोन्नतीबाबतचा विषय सातत्याने मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णर्याच्या अधीन राहून सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत समितीने अनुकूलता दर्शविली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशात काय?

सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भात काढलेल्या शासन आदेशानुसार, पदोन्नतीच्या कोटय़ातील कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता मागासवर्गीयांची सर्व म्हणजे शंभर टक्के रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यास मान्यता देण्यात आली.

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आड येणारे २९ डिसेंबर २०१७ चे परिपत्रकही रद्द करण्यात आले आहे. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो काही अंतिम निर्णय देईल, त्यानुसार मागास प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.

- लोकसत्ता

शासननिर्णय सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन :- शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत....