सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

आदिवासी उपयोजना उपस्थितीभत्ता स्थगितीबाबत.....

📒 आदिवासी उपयोजना २०२० -२१ अंतर्गत उपस्थिती भत्ता स्थगितीबाबत.....

माननीय संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत शाळा बंद असून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. करिता इयत्ता पहिली ते चौथी मधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्र व्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसूचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो. परंतु यावर्षी सन 2020 21 मध्ये covid-19 चा प्रादुर्भाव शाळा बंद असल्याने सदर योजनेचा लाभ देण्यात येऊ नये असे माननीय शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित केलेले आहे.

🌐माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेले परिपत्रक खालील प्रमाणे आहे.




PDF file download Link :- 




रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

UPSC परिक्षा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम-२०२१

✍️ सामायिक प्रवेश परीक्षा - 2021

UPSC नागरी सेवा परीक्षा - 2021च्या पूर्वतयारीसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम - 2021

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2021 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता राज्य प्रशासकीय व्यवसायिक शिक्षण संस्था मुंबई सह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर केंद्रातील प्रशिक्षण प्रवेशास सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याकरिता इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

🌐 ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट  - www.siac.org.in

🌐 ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता रजिस्ट्रेशन 

- https://register.siacexam.org/

🌐 ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात - ०८/०२/२०२१

🌐 ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक - ०७/०३/२०२१

🌐 अभिरूप चाचणी (Mock Test) - २८/०३/२०२१

🌐 सामायिक प्रवेश परीक्षा निकाल - २८/०३/२०२१

📝 जाहिरात -

UPSC सामायिक प्रवेश परीक्षा- 2021 राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई (SIAC).



शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत

शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय.....

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राज्य शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर निर्बंध घालणारे २९ डिसेंबर २०१७ चे परिपत्रकही रद्द करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या २००४ च्या आरक्षण कायद्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर आरक्षण लागू करणारी तरतूद मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट २०१७ रोजी रद्द केली. राज्य सरकारने त्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल केली असून ती सध्या प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अद्याप स्थगिती दिली नसल्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबलेली आहे. त्यातच राज्य शासनाने २९ डिसेंबर २०१७ रोजी एक परिपत्रक काढून मागसर्गीयांच्या पदोन्नतीवर निर्बंध घातले. मागासवर्गीयांची रिक्त पदे ठेवून केवळ खुल्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड आदी मंत्र्यांनी मागावर्गीयांच्या पदोन्नतीबाबतचा विषय सातत्याने मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णर्याच्या अधीन राहून सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत समितीने अनुकूलता दर्शविली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशात काय?

सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भात काढलेल्या शासन आदेशानुसार, पदोन्नतीच्या कोटय़ातील कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता मागासवर्गीयांची सर्व म्हणजे शंभर टक्के रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यास मान्यता देण्यात आली.

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आड येणारे २९ डिसेंबर २०१७ चे परिपत्रकही रद्द करण्यात आले आहे. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो काही अंतिम निर्णय देईल, त्यानुसार मागास प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.

- लोकसत्ता

शासननिर्णय सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन :- शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या कोटय़ातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत....



बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

शासनाचे परिपत्रक :- बौद्ध जात व धर्म नोंदणी करणेबाबत......

 


शासनाचे परिपत्रक :- बौद्ध जात व धर्म नोंदणी करणेबाबत......

महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा विशेषत: अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांच्या मुलांची नावे पहिल्या वर्गात दाखल करताना त्यांच्या धर्म व जातीची नोंद पालकांनी सांगितल्याप्रमाणे धर्म व जातीच्या रकान्यात करण्याबाबत सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित आणि खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना सुचित करण्याविषयी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्री. श्याम तागडे यांनी श्रीमती वंदना कृष्णा अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 22 जानेवारी 2021 च्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे.



दहावी बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर....


दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक २०२१ जाहीर.... 

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालये अनेक महिने बंद ठेवण्यात आली. मात्र याच महिन्यामध्ये राज्यातील काही शहरांमधील महाविद्यालये आणि शाळा सुरु करण्यात आल्या. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे परिक्षांचा काळ जवळ येऊन लागल्याने त्यासंदर्भातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत सन मार्च एप्रिल 2021 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर जाहीर करण्यात आलेले आहे.....

करोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक बदललं आहे. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही आजपासून म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२१ पासून हे नवीन वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठीही एप्रिल आणि मे महिन्यामधील लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले आहे. करोनासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतच परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

हे वेळापत्रक संभाव्य वेळापत्रक म्हणून जाहीर केलेले आहे, हे निश्चित स्वरूपाचे वेळापत्रक नाही. या वेळापत्रकात बोर्ड मार्फत कधीही केव्हाही बदल होऊ शकतो हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

🌐 महत्वाच्या लिंक :- 

१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांचे जाहीर प्रकटन :-


२) SSC दहावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक :-



3) HSC बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक :-



📝 दहावी बारावी संभाव्य वेळापत्रक संबंधी लोकमत पेपर मध्ये आलेली बातमी :-



शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

DCPS/NPS खात्यातून परतावा रक्कम काढण्यासाठी अटी व शर्ती


📝 DCPS/NPS खात्यातून परतावा रक्कम काढण्यासाठी अटी व शर्ती : 

१) सदर रक्कम ही कर्मचारी यांचे खात्यात जमा असलेल्या एकूण रकमेपैकी शासनाचा हिस्सा त्यांची जमा रक्कम व एकूण जमा व्याज रक्कम वजा जाता केवळ आपल्या हिश्श्याच्या जमा रकमेपैकी जास्तीत जास्त 25 टक्के रक्कम काढता येते.



२) DCPS/NPS कर्मचारी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यास नोकरीचा राजीनामा दिल्यास किंवा कामावरून काढले असल्यास तसेच कर्मचारी मयत किंवा कायमस्वरूपी अपंग झाल्यास जमा रकमेचा परतावा करण्यासाठी खालील सूचनेनुसार कागदपत्रांची आवश्यकता असते. 


📒 NPS SERVICES :

1) Update FACTA details

2) Update Email ID And Mobile Number

3) Reprint PRAN card

4) Change in Scheme Preference

5) Tier 1 and 2 withdrawal

6) View Account Details/Transactions Statement

🌐 Important link :-

1) Login and Set/Reset PRAN/IPIN  :

https://cra-nsdl.com/CRA/

2) DCPS/NPS Annual Statement आपल्या ईमेलवर प्राप्त करून घ्या... त्यासाठीची लिंक :

https://cra-nsdl.com/CRAOnline/asomPreLogin.html

3) शासननिर्णय : DCPS/NPS योजनेअंतर्गत सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाना रुपये दहा लाख सानुग्रह अनुदान प्रदानाकरीता प्रशासकीय विभागांनी लेखाशिर्ष संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत..‌‌

https://drive.google.com/file/d/1yDSFXjrSLnDMH5OhbgiyzYRk2n-K4vs1/view?usp=drivesdk

4) वेतन पडताळणी मार्गदर्शिका - 2021 :

https://drive.google.com/file/d/1vfoLcVCyOzd-aKCXuOpDheSLSiS9aer-/view?usp=drivesdk

===================================

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

RTE 25% Admission Procedure 2021-22 ला सुरुवात..‌.


📒 RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2021- 22 ला सुरुवात :

        महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे अंतर्गत दरवर्षी प्रमाणे सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षाच्या RTE अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी व विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

       यावर्षीची RTE २५% दुर्बल व वंचित विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.

        तरी विद्यार्थी व पालकांनी खाली दिलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रिया खाली दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन व्यवस्थितरित्या सर्व प्रकारचे निकष समजून घ्यावे व आपल्या पाल्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून प्रवेश निश्‍चित करावा..

📒 RTE प्रवेश प्रक्रिया 2021 - 22 महत्वाच्या लिंक :

१) RTE 25% Admission Portal Link :

२) ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक : https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

📝 प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन मार्फत निर्गमित करण्यात आलेले पत्र :

(कृपया सर्वांनी पत्र व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक वाचावे आणि त्यानुसार दिलेल्या सूचनांनुसार निकष पूर्ण करावे.)


📒 RTE प्रवेश प्रक्रिया 2021 - 22  संभाव्य वेळापत्रक :


📝 पालकांना ऑनलाईन फॉर्म भरणेकरीता दिनांक व शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे निर्गमित केलेले परिपत्रक :-

 दि. ३ मार्च 2021 ते 21 मार्च 2021 पर्यंत